या कारणांमुळे अनिल कपूर फिटनेसच्या बाबतीत तरुणा...

या कारणांमुळे अनिल कपूर फिटनेसच्या बाबतीत तरुणाईला देतात टक्कर (Young Generation Can Take Inspiration From These Specialties Of Anil Kapoor)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर भलेही ६५ वर्षांचे झाले असतील  पण त्यांच्या फिटनेसकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते ज्या प्रकारे मेहनत घेत असतात ते पाहून आजच्या तरुणाईने त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अनिल कपूर त्यांच्या व्यायामापासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत खूप काळजी घेत असतात.

अनिल कपूर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगा करतातच पण सोबत सायकलिंग सुद्धा करतात. खरेतर ते फिटनेससाठी सायकलिंग करत असले तरी त्यांना स्वत:ला सायकल चालवायला खूप आवडते. त्यामुळे ते त्यांना वेळ मिळेल तेव्हा सायकलवर फेरफटका मारतात.

आजच्या काळात फिटनेससाठी योगाचा वापर जास्त होतो. अनिल कपूरला पण योगा करायला खूप आवडतो. ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे योगा करतानाचे फोटो पोस्ट करत असतात. कठीणातले कठीण व्यायाम ते किती सहज करतात हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. 

अनिल कपूर यांच्या डॅशिंग पर्सनालिटीच्या आजही अनेक तरुणी दिवाण्या आहेत. ते त्यांच्या लूक्सवर विशेष लक्ष देतात. तुम्ही त्यांना कधीही कोणत्या व्हिडिओ, फोटो किंवा समोरासमोर पहा ते नेहमीच तुम्हाला देखणेच दिसतील. त्यांचा लूक आणखी जबरदस्त बनवण्यात त्यांचा चष्मा मदत करतो.

अनिल कपूर यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची खूप आवड आहे. त्यांना नेमबाजी उत्कृष्ट जमते. त्यामुळे कधीही संधी मिळाली तर ते नेमबाजी आवश्य करतात.

सध्या ते त्यांच्या जूग जूग जियो चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या ही चित्रपटातून त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या कामाचे सगळीकडे कौतुक होत आहे.