बिग बॉसमध्ये तरुण शिवलीला आपले अश्रू का आवरू शक...

बिग बॉसमध्ये तरुण शिवलीला आपले अश्रू का आवरू शकली नाही? (Young Contestant Shivleela Could Not Control Tears In Big Boss Marathi)

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून नवनवीन टास्कमुळे स्पर्धाकांमध्ये टक्कर देखील सुरु झाल्याचं चित्र पाहायाला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आली. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि उत्कर्ष पहिल्या साप्ताहिक कार्याचा विजेता ठरला. पहिल्या दिवसापासून मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद होत आहे, त्यामुळे ती बरीच चर्चेत आहे. सगळ्याच घरच्यांनी तिचा राग अनुभवला.

Shivleela, Big Boss Marathi

बिग बॉस मराठी ३ च्या घरात प्रत्येक स्पर्धकाला टिकून राहण्यासाठी वेगवेगळे टास्क दिले जात आहेत. अन्‌ त्यानुसार घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची धडपड सुरू झाली आहे. एकमेकांना शह काटशह देत स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करत आहेत. हे करत असताना चेहऱ्यावर एक भाव आणि मनात वेगळाच विचार अशा पद्धतीने सगळेजण वागत आहेत. हे सगळे बघून तरुण कीर्तनकार शिवलीलाला, आपण या सर्वांसमोर कसे टिकून राहणार अशी चिंता सतावत आहे. तर दुसरीकडे आपल्याला ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी ३ च्या घरात वागत आहोत ते पाहून आपल्या घरच्यांना विशेष करून आईला काय वाटत असेल, असा विचार करून ती भावूक झाली आहे.

Shivleela, Big Boss Marathi

याबद्दल ती दुसरी स्पर्धक मीनलशी बोलल्यानंतर तिने तिला समजावले की, “तू खूप छान वागते आहेस. चांगलं खेळते आहेस. तुझी मतं क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत.” मीनलशी बोलताना शिवलीलाला रडूच कोसळले. तेव्हा विशाल निकमने देखील “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात. टेन्शन न घेता खेळा”, असे म्हणत शिवलीलाला धीर दिला आहे.

शिवलीला पाटील या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावात राहणाऱ्या आहेत. सोशल मीडियावर त्यांची कीर्तने प्रसिद्ध आहेत. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करते.