टायगर श्रॉफचे उपजत गुण ऐकताच तुम्ही चकित व्हाल ...

टायगर श्रॉफचे उपजत गुण ऐकताच तुम्ही चकित व्हाल (You Will Be Stunned To Know These Specialities Of Tiger Shroff)

‘हिरोपंती 2’ या चित्रपटाला फार काही यश लाभले नाही, पण त्या निमित्ताने नायक टायगर श्रॉफ प्रसिद्धीस पावला. ‘हिरोपंती’ या चित्रपटानेच त्याने आपली कारकीर्द सुरू केली खरी; पण काही ना काही कारणांनी तो टीकेचा धनी ठरला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


खरं पाहायला गेलं तर टायगर चांगलाच टँलेन्टेड आहे. गेल्या 8 वर्षांपासून, खडतर कष्टाच्या जोरावर त्याने ॲक्शन हिरो म्हणून स्वतःला प्रस्थापित केले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


पण हा टायगर चांगला गायक आहे. त्याचा हा गुण फार कमी लोकांना माहीत आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


आपल्या फिटनेस बाबत अतिशय जागरूक असणारा टायगर मार्शल आर्टपटू आहे. त्याने चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांना या कलेत मदत केली आहे. 2014 सालच्या तायक्वांडो स्पर्धेत टायगरला पाच डिग्री ब्लॅक बेल्ट देण्यात आला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


टायगर शिवभक्त आहे. दर सोमवारी व महाशिवरात्रीला तो उपवास करतो.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
शिवाय टायगर, सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. जवळपास रोजच तो, चाहत्यांसाठी या मंचावर, आपल्या फिटनेसचे व्हिडिओ शेअर करतो. टायगर श्रॉफचे इन्स्टाग्राम वर 34 मिलियन्स पेक्षाही जास्त चाहते आहेत.