अमिताभ बच्चनच्या घरात आहे कोट्यवधी रुपयांचा बैल...

अमिताभ बच्चनच्या घरात आहे कोट्यवधी रुपयांचा बैल (You Will Be Stunned To Know The Price Of Bull Painting In Big B’s House)

बॉलिवूडचा शहेनशहा, महानायक अमिताभ बच्चन यांना चर्चेत राहण्यासाठी कोणतंही कारण पुरेसे आहे. मात्र सध्या त्यांचा एक फॅमिली फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागचे कारण बिग बी किंवा त्यांचे कुटुंबीय नसून त्यांच्या फोटोमध्ये मागे जे पेंटिंग दिसत आहे, त्या पेंटिगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यांनी ज्यांनी अमिताभ बच्चन यांचा तो फॅमिली फोटो पाहिलाय त्यांचे नक्कीच या पेंटिंगकडे लक्ष गेले असणार, कारण ते खूप सुंदर आणि वेगळे आहे. तुम्ही या पेंटिंगच्या किंमतीचा अंदाज लावू शकाल का? याची किंमत ऐकून तुम्ही दोन फुट उडाल…!

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बींसोबत जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा दिसत आहेत. फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब सोफ्यावर बसले आहे आणि त्यांच्या मागे एक मोठे पेंटिंग आहे. या पेंटिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेटकरी हे पेटिंग पाहून पसंतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींनी या पेंटिंगला वेलकम चित्रपटाच्या मजनू भाईचे पेंटिंग असे म्हटले आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अमिताभ बच्चन यांच्या ड्रॉईंग रूममधील या पेटींगमध्ये बैलाचं चित्र आहे. अन्‌ या पेंटिंगची किंमत ४ कोटी रुपये आहे. हे पेंटिंग मनजीत बावा नावाच्या कलाकाराने बनवले आहे. हे मनजीत बावा पंजाबमधील धुरी येथे राहणारे आहेत. ते सूफी तत्त्वज्ञान आणि भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरणा घेऊन चित्रे काढायचे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मनजीत बावांची कला जगभर सोथबी सारख्या मोठ्या लिलावगृहांद्वारे विकली जाते. भगवान शिव आणि माता काली हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत. याशिवाय निसर्ग, प्राणी, फ्लूट मोटिफ (बासरीचे आकृतिबंध) आणि मानव अन्‌ प्राण्यांसोबत जगण्याची कल्पना यांवर त्यांनी चित्रे काढली आहेत. त्यांच्या प्रत्येक कलेची किंमत तीन ते चार कोटी आहे.