हे आहे टायगर श्रॉफचे खरे नाव (You May Not Know ...

हे आहे टायगर श्रॉफचे खरे नाव (You May Not Know The Real Name Of Tiger Shroff)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये टायगर श्रॉफचे नाव घेतले जाते. टायगर प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे. तो केवळ अभिनेताच नाही तर एक चांगला गायक आणि उत्कृष्ट मार्शल आर्टिस्टसुद्धा आहे. टायगर आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्यांचे वडील जॅकी श्रॉफ हे देखील इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. इंडस्ट्रीत जरी तो टायगर या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे खरे नाव वेगळेच आहे.

टायगरचा जन्म 20 मार्च 1990 मध्ये झाला. त्याचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. त्याचे वडील जॅकी श्रॉफ त्याला प्रेमाने टायगर म्हणायचे. पुढे त्याचे तेच नाव प्रसिद्ध झाले.टायगर श्रॉफच्या बहिणीचे नाव कृष्णा श्रॉफ आणि आईचे नाव आयेशा श्रॉफ आहे. टायगर श्रॉफ हा शंकर महादेवांचा खूप मोठा भक्त आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला तो उपवासही ठेवतो.

टायगर श्रॉफला मार्शल आर्टचा अनुभव असल्यामुळे त्याने अनेक चित्रपटांमध्ये कलाकारांना प्रशिक्षणही दिले आहे. टायगरच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘हिरोपंती’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या नृत्याचे खूप कौतुक झाले होते.

प्रोफेशनल लाईफसोबतच टायगर आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असतो. त्याचे नाव अभिनेत्री दिशा पाटणीसोबत जोडले गेले आहे. मात्र, सध्या त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोलले जाते.

 टायगर श्रॉफचा गणपत हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. टायगर श्रॉफ चित्रपटांमध्ये स्वतः सर्वात धोकादायक स्टंट करतो. फार क्वचितच तो बॉडी डबल वापरतो.  

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम