बेढब शरीरावर टीका करणाऱ्या चाहत्यांना रुबिना दी...

बेढब शरीरावर टीका करणाऱ्या चाहत्यांना रुबिना दीलैकने घेतले फैलावर : म्हणते 1 इंच वजन वाढलं तरी हे लोक म्हातारी, म्हैस अशी विशेषणे लावतात… (You Gain One Extra Inch, They Start Commenting – Buddhi Ho Gayi, Bhains Lag Rahi Hai…. Rubina Dilaik Opens Up On Body Shamed)

बिग बॉसची विनर, छोटी बहू रुबिना दीलैकने (Rubina Dilaik) शेमिंग अर्थात बेढब शरीराबाबत (Body Shamed) आपलं दुःख याआधी व्यक्त केलं होतं. अन आत्ताही ई-टाइम्सशी केलेल्या गप्पागोष्टींमध्ये तिनं ट्रॉलर्सना फैलावर घेतलं…
रुबिना सांगते की, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणालाही ट्रोल करणं अगदी सोपं होऊन बसलं आहे. समोरच्या माणसाच्या भावनांची कदर न करता, मनाला येईल ते शेरे मारतात…

कोविडचे उपचार घेतल्यानंतर, आपल्या वाढलेल्या वजनाच्या बाबतीत, रुबिना आधी बोलली होती की, मी स्वतःवर प्रेम करायला शिकते आहे. शरीराने धष्टपुष्ट झालं तरी स्वतःला स्वीकारणे गरजेचे आहे. आता तिने पुन्हा आपली दुखरी नस बोलून दाखवत म्हटलं आहे की, माझ्या बरोबरीचे बरेच स्टार्स बॉडी शेमिंग सहन करतात. आम्ही स्टार्स आहोत, तेव्हा आम्ही नेहमीच परफेक्ट दिसलो पाहिजे, असं लोकांना वाटतं. इंचभर वजन वाढलं तरी लगेच ते बोलतात की, ‘अरे ही तर म्हातारी झाली आहे. सगळा चार्म गेलाय. म्हशीसारखी दिसते. तिची चाल बघा, तिचे कपडे बघा….’ आता घरी बसून पोरं काढली पाहिजेत, इतपत लोक मला सल्ला देऊ लागतात.
असल्या कमेंटस झेलून आमच्यावर परिणाम होतो. तर यांच्याविरुद्ध आवाज कां उठवू नये? माझ्या विचारांचा, बोलण्याचा जर काही परिणाम होत असेल, तर मी आवाज का उठवू नये?
झोंबणाऱ्या कमेंट करणाऱ्या लोकांना कसं तोंड द्यायचं नि त्यांचा परिणाम आपल्यावर कसा होऊ द्यायचा नाही, हेही आम्हाला कळलं पाहिजे. आपण कसं दिसावं, काय कपडे घालावेत, कसं राहावं, ही माझी मर्जी आहे. त्यावर कमेंट करणारे तुम्ही कोणीच नव्हते.

बघा मी लहान गावातून, बराच संघर्ष करून, हे यश मिळवलं आहे. त्याबद्दल माझ्या घरच्यांनी व अभिनवने मला सपोर्ट दिला आहे. पण माझा पती अभिनव आणि माझे आई-वडील आणि बहीण यांच्या मनाला डागळया देण्याचे काम कोणी करत असेल, तर मला खपणार नाही. माझ्यातील दुर्गा मग जागृत होते, अन सांगते की, बाबांनो माझ्या वाटेला जाऊ नका. मी तुम्हाला सोडणार नाही…..