कतरिना कैफ सारखी टोन्ड फिगर मिळवण्यासाठी फॉलो क...

कतरिना कैफ सारखी टोन्ड फिगर मिळवण्यासाठी फॉलो करा तिचा डाएट प्लॅन (You Can Also Get Toned Figure By Following Katrina’s Diet Plan)

अभिनयाच्या क्षेत्रात सतत सक्रीय राहण्यासाठी अन्‌ हिट होण्यासाठी कलाकार मंडळींना अभिनय कौशल्यासोबत, टोन्ड फिगर असणे देखील आवश्यक आहे, आकर्षक दिसणं आणि असणं ही येथील पहिली पात्रता असते. म्हणूनच टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स असोत किंवा फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स, ते स्वतःला आकर्षक आणि फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. अशा बॉलीवूड स्टार्सपैकी एक अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आहे, जी तिच्या सडपातळ शरीरयष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण हे तंदुरुस्त शरीर तिला जन्मतःच मिळालेले नाही, तर तिने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवत, त्यासाठी शारीरिक श्रमही घेतले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कतरिना कैफच्या सिक्रेट डाएट प्लॅनबद्दल (Katrina’s Diet Plan) ज्यामुळे ती इतकी सुंदर व आकर्षक दिसते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कतरिना कैफचा डाएट प्लॅन – स्वतःला फिट ठेवण्यासाठी कतरिना कैफ मॅक्रोबायोटिक डाएट प्लॅन फॉलो करते. हा आहार कतरिनाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि तिला निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यास प्रेरित करतो. मॅक्रोबायोटिक आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते. सर्व वयोगटातील लोक हा आहार घेऊ शकतात. हा आहार तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवण्याचे काम करतो.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

पुरेसे पाणी – शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी कतरिना भरपूर पाणी वापरते. विशेषतः सकाळी ती किमान ४ ग्लास पाणी पिते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी अतिशय उपयुक्त ठरते. पाण्याच्या साहाय्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करता येते. पाण्यात अनेक प्रकारची खनिजे असतात, जी शरीराला पोषण देण्याचे देखील काम करतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

उकडलेल्या भाज्या – कतरिना कैफ आठवडाभर फक्त उकडलेल्या भाज्या, सूप, ज्यूस इत्यादीचे सेवन करते. आठवड्यातून एकदा ती तिच्या आवडीचे पदार्थ खाते. ती मनावर अन्‌ जिभेवरही ताबा ठेवते, जे प्रत्येकासाठी सोपे नसते. म्हणूनच ती स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवून आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हंगामी फळे – कतरिना हंगामी फळं अगदी न चुकता खाते. ऋतूमानानुसार शरीराला सर्व पोषक तत्वं ही नैसर्गिकरित्याच मिळत असतात. ही पोषक तत्वं आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या हंगामी फळे आणि भाज्यांमध्ये असतात. सर्दी आणि फ्लू सारख्या समस्यांशी लढण्यासाठी ही फळे उपयुक्त ठरतात. या सर्वांसोबतच कतरिना भरपूर फायबरयुक्त अन्नही घेते, जे आपली पचनक्रिया सुधारण्याचे काम करते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

नाश्त्यात ओट्स खाते – कतरिना कैफला नाश्त्यात ओट्स खाणे आवडते. ओट्‌स हा प्रत्येकासाठी सर्वोत्तम नाश्ता मानला जातो. हे खाण्यासही चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. मधुमेहात उपयुक्त अन्‌ त्यास बद्धकोष्ठतेचा डॉक्टर म्हटलं जातं. ओट्सच्या सेवनाने त्वचा चमकदार बनते. वजन कमी करण्यास मदत होते. तसेच ओट्‌स तणावापासून आपल्याला दूर ठेवते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कतरिनाचे दुपारचे जेवण – दुपारच्या जेवणात कतरिना कैफला ग्रील्ड फिशसोबत ब्राऊन ब्रेड आणि लोणी खायला आवडते. ग्रील्ड फिशमध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. जास्त मासे खाल्ल्याने व्यक्ती अधिक बुद्धिमान बनते. संध्याकाळच्या वेळेस कतरिना ब्राऊन ब्रेडसोबत पीनट बटर खाते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रात्रीचे जेवण – रात्रीच्या जेवणात कतरिना कैफ मासे, चपाती, व्हेज सूप आणि ग्रील्ड भाज्या खाणे पसंत करते. तिला रात्री खूप हलके अन्न खायला आवडते. खाण्यापिण्याव्यतिरिक्त, कतरिना जीममध्ये भरपूर मेहनत करते, ती योग आणि ध्यान करते.

तुम्हालाही जर कतरिनासारखी आकर्षक शरीरयष्टी मिळवायची असेल, तर आजपासून सुरुवात करा, खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा.