‘वेब सिरीजमधून तरुणांना बिघडवण्याचे काम त...

‘वेब सिरीजमधून तरुणांना बिघडवण्याचे काम तुम्ही करताय्’ : सर्वोच्च न्यायालयाचे एकता कपूरवर ताशेरे (‘You Are Spoiling The Mentality Of Young Genration’ : Supreme Court’s Strictures On Ekta Kapur)

सुप्रसिद्ध मालिका व चित्रपट निर्माती एकता कपूरला एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. ‘तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात’ अशा शब्दात न्यायालयाने तिला खडसावले आहे.

एकता कपूर निर्मित ‘एक्स एक्स एक्स’ या वेब सिरीजमधील काही आक्षेपार्ह दृश्यांबाबत न्यायालयाने तिच्यावर ठपका ठेवला आहे. सदर मालिकेत लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार एकता विरुद्ध गुदरण्यात आली असून त्यावर तिच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मात्र या अटक वॉरंट विरोधात एकताने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याच्या सुनावणी दरम्यान वरील ताशेरे ओढण्यात आले. ‘ओटीटी मंचावरील मालिका सर्व लोक पाहतात. तुम्ही लोकांपुढे कोणत्या प्रकारचे पर्याय ठेवत आहात?’ असा प्रश्न न्यायालयाने केला. तर अशाच प्रकारच्या अन्य एका प्रकरणात सर्वोच्या न्यायालयाने एकताला संरक्षण दिले होते. शिवाय वेब मालिका वर्गणीदारांसाठी असतात. अन्‌ या देशात लोकांना आपला पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असा युक्तीवाद एकता कपूर तर्फे तिच्या वकिलांनी केला.