तू माझा शक्ती अस्त्र आहेस असे म्हणत नीतू कपूरने...

तू माझा शक्ती अस्त्र आहेस असे म्हणत नीतू कपूरने रणबीर कपूरला दिल्या वाढदिवसाच्या भावनिक शुभेच्छा (‘You Are My Shakti Astra’ -Mom Neetu Kapoor Wishes Son Ranbir Kapoor On His 40th Birthday, Writes An Emotional Note)

रणबीर कपूर आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रणबीर भले सोशल मीडियावर नसता तरी पण त्याचे चाहते, मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य त्याला तिथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली रणबीरची आई नीतू कपूर यांनीही आपल्या मुलाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्यांनी एक भावनिक नोटही शेअर केली आहे.

नीतूने इंस्टाग्रामवर आपल्या मुलाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यासोबत एक भावनिक नोट देखील लिहिली आहे. त्यात त्यांनी मुलाला आपल्या शक्तीचे अस्त्र म्हणून संबोधले आहे. मुलगा रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नीतू कपूरने लिहिले, “हे वर्ष तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी महत्वाचे ठरले आहे!! मला तुझ्या बाबांची आठवण येत आहे. पण मला खात्री आहे की ते कुठेही असले तरी त्यांना सगळ्यात जास्त अभिमान वाटत असेल आणि ते तिथून शांतपणे सगळ्यांना पाहत असतील!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप प्रेम !! तू माझे शक्ती अस्त्र आहेस.”

बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर करून भाऊ रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक फोटो शेअर करत रिद्धिमाने ‘हॅप्पीएस्ट हॅपी बर्थडे बेबी ब्रो’ असे लिहिले आहे.

करिश्मा कपूरनेही रणबीरसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले आहे की, या दिवशी कपूर कुटुंबात एका खास कपूरने जन्म घेतला होता. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आता चाहत्यांच्या नजरा आलियाच्या पोस्टची वाट पाहत आहेत. कारण त्यांच्या लग्नानंतर रणबीरचा हा पहिलाच वाढदिवस आहे. अद्याप आलियाने कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. पण ती रणबीरचा वाढदिवस खास बनवण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.

काल रात्रीही नीतू कपूरसह करण जौहर, आदित्य रॉय कपूर, अयान मुखर्जी यांसारखे अनेक सेलिब्रेटी रणबीरला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्याकडे गेले होते.