ये जवानी है दिवानी फेम अभिनेत्री एव्हलीन शर्मा ...

ये जवानी है दिवानी फेम अभिनेत्री एव्हलीन शर्मा दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंपसोबत शेअर केला फोटो (Yeh Jawaani Hai Deewani’ Actress Evelyn Sharma Announces Her 2nd Pregnancy, Posts Cute Pictures Flaunting Her Baby Bump)

‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एव्हलिन शर्मा दुस-यांदा आई होणार आहे, नुकताच या अभिनेत्रीने आपला लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली एव्हलिन शर्मा पुन्हा एकदा तिच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी, एव्हलिनने 2021 मध्ये गरोदर असल्याची घोषणा केली होती आणि आता पुन्हा अभिनेत्री तिच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज् झाली आहे.

दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा करताना एव्हलिन शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या क्यूट फोटोंमध्ये अभिनेत्री आपला बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये एव्हलिनने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्स घातलेली दिसत आहे. बेबी बंपला सांभाळताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्टपणे दिसते. ही छायाचित्रे पोस्ट करताना एव्हलिनने कॅप्शन लिहिले – “तुला माझ्या हातात धरण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही!! बाळ #2 येत आहे!”

एव्हलिन शर्माने 15 मे 2021 रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये प्रियकर तुषानसोबत लग्न केले. लग्नाच्या 2 महिन्यांतच एव्हलिनने सोशल मीडियावर आपल्या पहिल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये सनबेडवर झोपून बेबी बंप फ्लॉंट करतानाचा तिचा फोटो व्हायरल झाला होता.