‘ये है मोहब्बतें’फेम बालकलाकार रुहानिका धवनने न...

‘ये है मोहब्बतें’फेम बालकलाकार रुहानिका धवनने नव्या घरात केला घरप्रवेश, शेअर केले फोटो (‘Yeh Hai Mohabbatein’ Fame Child Actress Ruhaanika Dhawan Performs ‘Griha Pravesh’, Shares Pics Of Her Lavish Home)

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ मधील बालकलाकार रुहानिका धवनने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मुंबईत नवीन घर विकत घेतले आहे. आणि आता रुहानिकाने आपल्या नवीन घरात ‘गृह प्रवेश’ केला आहे. ज्यांचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

‘ये है मोहब्बतें’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये बालकलाकार ‘रुही’ची भूमिका साकारणारी रुहानिका धवन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. कारण रुहानिकाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मुंबईत आपले ड्रीम हाउस विकत घेतले आहे.

 एवढ्या लहान वयात या बालकलाकाराने मुंबईसारख्या शहरात आपल्या स्वप्नातील घर विकत घेतले याचा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

रुहानिका मुंबईतील आपल्या नवीन घरात शिफ्ट झाली. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर घरप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत आणि आता रुहानिकाने मुंबईतील आपल्या नवीन घरात प्रवेश केला आहे.

रुहानिकाने इंस्टाग्रामवर आपल्या नवीन घराच्या घरप्रवेशाचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री गृहप्रवेशा दरम्यान आपल्या कुटुंबीयांसह पूजा करताना आणि मजा करताना दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना रुहानिकाने कॅप्शनही लिहिले आहे – माझ्या प्रियजनांसाठी, माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या आजसाठी, माझ्या उद्यासाठी आणि चांगल्या व कठीण काळात माझ्यासोबत असल्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. मी नेहमी माझ्या देवासमोर नतमस्तक होते. माझे गुरु, पापा, मम्मी आणि पृथ्वी यांना प्रणाम.

या फोटोंमध्ये रुहानिका आणि तिच्या आईने एकाच रंगाचा पोशाख परिधान केला आहे. दोघेही कॅमेऱ्यासमोर हसत हसत पोज देत आहेत. रुहानिकाचे भव्य घर झेंडूच्या फुलांनी अतिशय सुंदरपणे सजलेले दिसते.

फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम