ये है मोहबत्तें फेम बालकलाकार रुहानिका धवनने वय...

ये है मोहबत्तें फेम बालकलाकार रुहानिका धवनने वयाच्या 15 व्या वर्षी खरेदी केले अलिशान घर (‘Yeh Hai Mohabbatein’ Fame Child Actress Ruhaanika Dhawan Buys Lavish House At The Age Of 15, Deets Inside)

ये है मोहब्बते या टीव्ही मालिकेमध्ये दिव्यांका त्रिपाठीच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या रुहानिका धवनचे एक मोठे स्वप्न साकार झाले आहे. तिने आपल्या मेहनतीने हे स्वप्न साकार केले आहे. रुहानिकाने आपल्या स्वप्नातील घर स्वतःच्या कमाईने विकत घेतले आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी रुहानिका करोडोंच्या आलिशान घराची मालक बनली आहे.

मालिकेत रुही भल्लाच्या भूमिकेने रुहानिका प्रसिद्ध झाली. दिव्यांका त्रिपाठी तिची ऑन-स्क्रीन आई होती. दिव्यांकाने इशिताची भूमिका साकारली होती. ही मालिका खूप लोकप्रिय झाली. रुहानिकालाही त्याचा खूप फायदा झाला. बालकलाकार म्हणून तिच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. आज रुहानिकाने आपल्या मेहनतीच्या पैशातून एक आलिशान घर घेतले आहे.

आपल्या नवीन घराचे फोटो शेअर करताना रुहानिकाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने आपल्या आईचे एक गुपित देखील शेअर केले आहे.

रुहानिकाने लिहिले- वाहेगुरुजी आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांसोबत माझा आनंद शेअर करत आहे… एक नवीन सुरुवात!! माझे मन भावनांनी आणि आनंदाने भरलेले आहे आणि मी अत्यंत कृतज्ञ आहे… मी खूप मोठे स्वप्न पाहिले होते – ‘माझ्या स्वतःच्या मालकीच्या घराचे’ ही माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याची आणखी वाट पाहू शकत नाही. हे स्वप्न पूर्ण करण्यात मला मदत करणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्म आणि संधींबद्दल मी आणि माझे पालक खूप आभारी आहोत. अर्थात, माझ्या पालकांच्या मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय यापैकी काहीही शक्य झाले नसते. इथे मी माझ्या आईचा विशेष उल्लेख करीन कारण ती एक जादूगार आहे, ती प्रत्येक पैसे वाचवणारी आणि दुप्पट करणारी देशी आई आहे. ती कशी करते हे फक्त देव आणि तिलाच माहीत!! मी इथेच थांबणार नाही!! ही फक्त सुरुवात आहे. मी आधीच मोठी स्वप्ने पाहत आहे, मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करेन आणि अजून मेहनत करेन. मग मी हे करू शकले तर तुम्हीही करू शकता!! म्हणून स्वप्न पहा, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल.

रुहानिकाच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती जय हो आणि घायाळ वन्स अगेनमध्ये दिसली होती. याशिवाय तिने मिसेस कोशिश की पांच बहुएंमध्ये काम केले होते, हा तिचा डेब्यू शो होता. रुहानिका 2012 पासून काम करत आहे. तिने मेरे साई आणि इतर अनेक लोकप्रिय शोमध्येही काम केले आहे.