ये है मोहबत्तें फेम कृष्णा मुखर्जीने बॉयफ्रेंड ...

ये है मोहबत्तें फेम कृष्णा मुखर्जीने बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालासोबत बंगाली रितीरिवाजात केले लग्न (Yeh Hai Mohabbatein Actress Krishna Mukerjee Marries Boyfriend Chirag Batliwalla In Bengali Ceremony, See pics)

ये है मोहब्बते फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने तिचा प्रियकर चिराग बाटलीवालासोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याने गोव्यात बंगाली रितीरिवाजांनुसार लग्नाचे सर्व विधी पार पाडले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही शोमध्ये आलियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने प्रियकर चिराग बाटलीवालासोबत लग्नगाठ बांधली आहे.

कृष्णाचे पती क्रूझ जहाजात अधिकारी आहेत. या जोडप्याने गोव्यात बंगाली रितीरिवाजांनुसार लग्नाचे सर्व विधी पार पाडले.

अभिनेत्रीने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवाला यांनी 13 मार्च 2023 रोजी बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले. त्यानंतर दोघांनी पारशी रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केले.

अभिनेत्रीचा पती चिराग बाटलीवाला पारशी कुटुंबातील आहे, त्यामुळे दोघांनी आधी बंगाली रितीरिवाजांनुसार, नंतर पारशी रितीरिवाजांनुसार लग्न केले.

अभिनेत्रीने डोक्यावर कुंकू, गळ्यात हार आणि हातात बांगड्या असा साधा लूक ठेवला होता. तसेच केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरे लावले होते.

पारशी वधूच्या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीच्या पारशी लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री पती चिरागसोबत रोमँटिक डान्स करताना दिसली.

बंगाली पद्धतीने लग्न करताना कृष्णाने पारंपरिक वधूचा लूक ठेवला होता. अभिनेत्रीने पांढऱ्या आणि लाल रंगाच्या लेहेंग्यासह डबल मोत्याचा हार घातला होता. तसेच माथा पट्टी आणि कानातले घालून आपला लूक पूर्ण केला.