ये हे मोहबतें फेम रुहानिका धवनच्या आईवर लावले म...

ये हे मोहबतें फेम रुहानिका धवनच्या आईवर लावले मुलीच्या बालमजुरीचे आरोप(‘Ye Hai Mohabbatein’ Fame Ruhaanika Dhawan’s Mother Accused Of Child Labor, Ruhaanika Has Recently Bought A House Worth Crores At The Age Of 15)

ये है मोहब्बते या टीव्ही मालिकेतील रुही म्हणजेच रुहानिका धवनने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मुंबईत करोडोंचे घर घेतले आहे आणि तेही स्वतःच्या पैशाने. त्यासाठी लोकांनीही रुहानिकाचे अभिनंदन केले आणि तिचे खूप कौतुक केले. पण काही लोक रुहानिकाच्या पालकांवर बालमजुरीचा आरोपही करत आहेत.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रुहानिका आणि तिची आई डॉली धवन यांनी या आरोपाबाबत सांगितले. रुहानिकाला पाहून कोणीही दबाव घेऊ नये, असे त्या म्हणाल्या. तसेच रुहानिकावर जास्तीचे काम करण्यासाठी आम्ही दबाव टाकला नाही. केवळ एका मोठ्या शोमधून रुहानिकाला मोठी रक्कम मिळाली, असेही नाही. आम्ही फक्त योग्य मार्गाने पैसे गुंतवले. या कामालाही वर्षे लागली. एका रात्रीत काहीही झाले नाही. आपोआप गोष्टी घडत गेल्या.

बालमजुरीबद्दल सांगायचे तर रुहानिकाने गेल्या चार-पाच वर्षांत एकही शो केलेला नाही. आम्ही अशा कमेंट्स जास्त वाचत नाही, नाहीतर विनाकारण नाराज व्हायला होते. मी मोठी आहे, म्हणून मी रुहानिकाचे पैसे व्यवस्थितपणे गुंतवले. तर रुहानिका असेही म्हणली की तिच्यावर कोणतेही दडपण नव्हते. मला व्हिडिओ बनवायला आवडते आणि हा माझा छंद आहे. मी स्वतःच्या इच्छेने आणि आवडीने काम करते.

रुहानिका म्हणाली की, या शहरात वन बीएचके खरेदी करणे देखील खूप महाग आहे, म्हणून मी हे घर घेतले आहे, त्यामुळे मी माझ्या पालकांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली याचा मला आनंद आहे. आता माझे पैसेही संपले आहेत. आम्ही अनेक घरे बघितली आणि मग हे फायनल केले. आम्ही गेली 8 वर्षे पैसे साठवत होतो, त्यामुळेच आम्ही हे घर घेऊ शकलो.

रुहानिकाने सांगितले, की तिची आई जादूगार आहे. तिच्या समजूतदारपणामुळेच पैसा वाचवता येतो. अनेक टीव्ही सेलेब्सनी रुहानिकाचे अभिनंदन केल. आजची तरुणाई सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून वेळ वाया घालवत असताना या तरुण वयात रुहानिकाने मेहनतीने घर विकत घेतले. एक दिवस ती खूप मोठी अभिनेत्री बनेल.

त्याच वेळी, काही लोक ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत की टीव्ही कलाकारांना जास्त पैसे मिळतात आणि घर घेणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. होय, जर कोणी गरीब कुटुंबातील असेल आणि त्याने घर विकत घेण्यासाठी कष्ट केले तर त्याचे कौतुक केले जाते.