मुंबईच्या यास्मिन जाल मिस्त्री यांनी मिळवला ‘मि...

मुंबईच्या यास्मिन जाल मिस्त्री यांनी मिळवला ‘मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल २०२२’ चा मान (Yasmin Jal Mistry Wins ‘MRS. WORLD INTERNATIONAL 2022’!)

मुंबई (दादर पारसी कॉलनी) येथील यास्मिन जाल मिस्त्री यांनी प्रतिष्ठित ‘मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल २०२२’ ही स्पर्धा जिंकून आपला देश आणि समाजाचा गौरव केला आहे. महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण ५२ स्पर्धकांमधून यास्मिन यांनी विजयाचा मुकुट आपल्या शिरपेचात रोवला आहे. यास्मिन यांनी याच स्पर्धेतील ‘मिस फोटोजेनिक’ ही उप-स्पर्धाही जिंकली आहे.

“देवाची कृपा तसेच माझ्या वडिलांचे आशीर्वाद आणि आईचे प्रेम, यामुळे मी ‘मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल २०२२’ ही स्पर्धा जिंकली आहे. ५ दिवसांच्या प्रदीर्घ कठोर प्रशिक्षणानंतर, सोबत अनेक उपस्पर्धांचे टप्पे पार करत मी मिसेस फोटोजेनिक २०२२ ही उपस्पर्धा जिंकली आणि शेवटी ५२ स्पर्धकांमध्ये विजेतेपद पटकावले,” असे यास्मिन यांनी म्हटले आहे.

‘मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल’ या स्पर्धेच्या माध्यमातून विवाहित महिलांना त्यांची प्रतिभा आणि सौंदर्य जगासमोर दाखवण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. ही सौंदयस्पर्धा म्हणजे स्त्रीत्वाचा उत्सव आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून महिलांना जागतिक स्तरावर ओळख मिळवण्याची संधी प्राप्त होते.

ही स्पर्धा समाजातील सर्व स्तरातील महिलांना त्यांचे सौंदर्य, त्यांची मूल्ये आणि जातीयतेचा स्वीकार करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी प्रोत्साहित करते. ज्या महिला मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करु इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

‘ग्लॅमर गुडगाव’ च्या श्रीमती बरखा नांगिया आणि श्री अभिषेक नांगिया यांनी ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल यास्मिन मिस्त्री यांनी त्यांचे खूप खूप आभार मानले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ग्लॅमर गुडगावच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचेही त्यांनी मनापासून कौतुक केले आहे.