यामी गौतमचे पांढऱ्या साडीतले आकर्षक लूक पाहून ल...

यामी गौतमचे पांढऱ्या साडीतले आकर्षक लूक पाहून लोक वेडावले (Yami Gautam Looks Stunning In White Saree Look : Fans Shower Love On Actress)

Yami Gautam, White Saree Look

लग्न झाल्यापासून आपल्या पारंपरिक आणि साध्या वेषात अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर लोकांना आकर्षित करते आहे. तिच्या लग्नातील वेषभूषा लोकांना बेहद्द पसंत पडली होती. अन्‌ आता तिच्या साध्या पांढऱ्या साडीतील रुपाने लोकांची मने तितकीच वेडावली आहेत.

Yami Gautam, White Saree Look

यामीचे साधे भारतीय परंपरेतील लूक पुन्हा चर्चेत आले आहे. या खेपेस तिने वेगळ्या पद्धतीने पांढरी साडी नेसली आहे.

Yami Gautam, White Saree Look

आजकाल यामी गौतम आपल्या ‘भूत पुलीस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गर्क आहे. त्यासाठी तिने वेगळ्या पद्धतीची साडी पेहरवून चर्चेला तोंड फोडले आहे.

Yami Gautam, White Saree Look

या खास प्रसंगी यामीने गोल्डन लेस लावलेली, पांढऱ्या रंगाची, धोती स्टाईलची साडी निवडली होती. ही साडी खूपच साधी वाटत असली तरी राजस होती.

Yami Gautam, White Saree Look

या साडीला शोभून दिसेल अशी व्हिंटेज गोल्ड ज्वेलरी यामीने परिधान केली होती. त्यामध्ये सोन्याचा नेकलेस, लॉन्ग डिटेलिंग इअरिंग्ज्‌ आणि बांगड्या होत्या. जोडीला तिने पांढरी सॅन्डल्स्‌ घातली होती. यामध्ये विशेष आकर्षण होते ते तिच्या पांढऱ्या ब्लाऊजचे. नेहमीचा ब्लाऊज घालण्याऐवजी तिने टँक टॉप घातला होता. त्यामुळे तिचे वेगळे रूप उठून दिसत होते.

Yami Gautam, White Saree Look

यामीचा मेकअप देखील मिनीमल होता. स्लीक आय लायनर, ब्लश चिक्स, न्यूड पिंक लिप्स, सटल आय शॅडो आणि सैलसर सोडलेले केस तिला शोभून दिसत होते. तिचं मंद स्मित, लोकांना मोहीत करत होते.

Yami Gautam, White Saree Look

‘भूत पुलिस’ या चित्रपटात यामी सह सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस हे कलाकार आहेत. यामीचा नायक अर्जुन कपूर आहे.