जागतिक मधुमेह दिन : तुमचा म...

जागतिक मधुमेह दिन : तुमचा मधुमेह नियंत्रणात कसा ठेवाल? (World Diabetes Day : How Will You Control Diabetes?)

मधुमेहासह आयुष्य जगणं हे सोपं नाही. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आजीवन गोळ्या, आणि आहारात पथ्य पाळावे लागते. रक्तातील ग्लुकोज (रक्तातील साखर) जास्त झाली की मधुमेह होतो. रक्तातील ग्लुकोज हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे अन्‌ ही ऊर्जा आपण खातो त्या अन्नातून मिळते. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने तयार केलेले संप्रेरक आहे, जे अन्नातून ग्लुकोजला ऊर्जेसाठी वापरण्यासाठी पेशींमध्ये जाण्यास मदत करते. काही वेळा, शरीर पुरेसे किंवा कोणतेही इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिन देखील वापरत नाही. त्यामुळे ग्लुकोज रक्तातच राहते.

मधुमेहाची काही सामान्य लक्षणे म्हणजे भूक, वजन कमी होणे, थकवा, अंधुक दिसणे, वारंवार लघवी होणे, चिडचिड, दंत समस्या, लघवीमध्ये केटोन्स असणे इ.

मधुमेह बालपणात किंवा पौगंडावस्थेत विकसित होऊ शकतो. 35 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त आहे.

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठीच्या काही टिप्स :

नियमित व्यायाम –

इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वेगाने चालणे, पोहणे, नृत्य करणे, धावणे यासारखे व्यायाम केल्यामुळे वजन कमी होण्यास आणि राखण्यास मदत होते. तसेच स्नायूंना उर्जेसाठी रक्तातील साखरेचा वापर करण्यास देखील मदत होते.

कार्बोहायड्रेट सेवन व्यवस्थापित करणे

शरीर कार्बोहायड्रेट्सचे साखर (ग्लूकोज) मध्ये विघटन करते आणि नंतर इन्सुलिन शरीराला ऊर्जेसाठी साखर वापरण्यास आणि संरक्षण करण्यास मदत करते.

भरपूर पाणी पिणे

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. निर्जलीकरण रोखणे मूत्रपिंडांना मूत्राद्वारे अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यास मदत करते. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके रक्त रिहायड्रेट होण्यास मदत होईल, रक्तातील साखर कमी होईल आणि मधुमेहाचा धोका कमी होईल.

तणावाचे व्यवस्थापन

तणावाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक प्रभाव पडतो. तणावादरम्यान ग्लुकागन आणि कॉर्टिसॉल हार्मोन्स स्रावित होतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

पुरेशी झोप

विश्रांती आणि झोपेचा अभाव रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकतो तसेच वजन वाढण्यास मदत करतो. रात्री ७-८ तास झोपणे महत्वाचे आहे.

रक्तातील साखर आढळलेल्या बहुतेक रुग्णांना नियमितपणे साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे. नियमित चाचणी केल्याने हृदयविकार, अंधत्व, उच्च कोलेस्टेरॉल, स्ट्रोक, किडनी समस्या, त्वचेची समस्या आणि रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन आरोग्याशी संबंधित समस्यांपासून दूर राहण्यास देखील मदत होऊ शकते.

दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. याच पाश्वर्वभूमीवर मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट डायबेटोलॉजिस्ट डॉ. अल्तमश शेख यांनी मधुमेह नियंत्रणात कसा ठेवाल यासंबंधी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.