जागतिक सायकल दिन : शोध आणि महत्त्व (World Cycle...

जागतिक सायकल दिन : शोध आणि महत्त्व (World Cycle Day : Origin And Importance)

दरवर्षी ३ जून रोजी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी तसंच त्याचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. शहरातील नागरिकांनी जवळचं अंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींचा वापर केला तर दररोज शेकडो लिटर पेट्रोलचा वापर कमी होईल आणि शहरातील प्रदूषण पातळीही कमी होईल, असं देखील सांगण्यात येतं. सायकल चालवणाऱ्यांच्या मते यामुळं सोशल डिस्टंसिंगचं देखील पालन होतं आणि ते सुरक्षित राहतात.

संयुक्त राष्ट्राने ३ जून २०१८ रोजी पहिला अधिकृत जागतिक सायकल दिवस साजरा केला होता.

हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि मधुमेह यासारखे आजार असणाऱ्यांनी दररोज सायकल चालवल्यास मृत्यूचा धोका कमी होतो. डॉक्टर सांगतात की, दररोज ३० मिनिटे सायकल चालवणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊयात सायकल चालवण्याचे फायदे.

चांगली झोप लागते : दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्यास चांगली झोप लागते. तुम्हाला रात्री झोप न लागण्याची समस्या असेल तर दररोज सायकल चालवल्याने या समस्येतून तुम्ही मुक्त होऊ शकता.

बुद्धी तल्लख होते : एका संशोधनातून हे समोर आले आहे, की जे लोक दररोज ३० मिनिटे सायकल चालवतात त्यांची बुद्धी इतर लोकांच्या तुलनेत अधिक सक्रिय असते. तसंच यामुळं मेंदूची शक्ती वाढण्याची शक्यता देखील १५ ते २० टक्क्यांनी वाढते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते : दररोज सायकल चालवल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. एका अहवालानुसार दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने रोगप्रतिकार पेशी सक्रीय होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

कॅलरीज बर्न होतात : सायकल चालवून अतिशय सहजरित्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने काही प्रसिद्ध लोकांनी सायकल चालविण्याविषयी काय म्हटलंय ते पाहूया.

  • आयुष्य हे सायकल चालविण्यासारखे आहे. आपलं अस्तित्व राखण्यासाठी आपण पुढे जाणे आवश्यक आहे – अल्बर्ट आइनस्टाइन
  • प्रौढ व्यक्तीला सायकलवर पाहणे म्हणजे मानवजातीच्या भविष्याबद्दल निश्चिंत होणे आहे – एचजी वेल्स
  • “जेव्हा मी सायकल चालविणे शिकलो तेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस होता” – मायकेल पालीन

सगळ्यांना जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा.