वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन आहे सलमान खा...

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन आहे सलमान खानची जबरदस्त फॅन, सुवर्ण जिंकल्यानंतर म्हणाली, लोकांसाठी भाऊ असेल, माझा जीव आहे…. (World Boxing Champ Nikhat Zareen Is A Huge Fan Of Salman Khan, She Calls Him ‘Meri jaan’)

भारताची महिला बॉक्सर निखत झरीननं (Nikhat Zareen) वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सिंग स्पर्धेत (Women’s World Boxing Championship) गोल्ड मेडल पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या या विजयासाठी सर्वच तिचे कौतुक करत आहेत. सेलेब्सपासून मोठमोठ्या राजकारण्यांपर्यंत सर्वच तिला शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीही निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.

सगळ्यांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडत असतानाच निखतने आपल्या मनातील गोष्ट सांगताना म्हटलंय की, तिचं एक स्वप्न तर आता पूर्ण झालंय परंतु दुसरं स्वप्न पूर्ण व्हायचं आहे, आणि ते स्वप्न आहे सलमान खानला भेटण्याचं. निखतला येथपर्यंत पोहचण्यासाठी बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला आहे. परंतु या संकटांनी तिला कमजोर न बनवता मजबूत बनवले आहे आणि आता ती ऑलिम्पीकमध्ये देखील भारताला विजय मिळवून देऊ इच्छिते.

दरम्यान सलमान खानने एनडीटीव्हीची एक व्हिडिओ क्लिप शेअर करत निखतचे सुवर्ण पदकासाठी अभिनंदन केले आहे. ही व्हिडिओ क्लिप अतिशय मजेशीर आहे. यात निवेदकाने निखतला विचारलंय की, नरेंद्र मोदीजींकडून अभिनंदनाचा संदेश मिळण्याची तुम्ही वाट पाहता होता, तो तुम्हाला मिळाला आहे; परंतु सलमान भाईकडून तुम्हाला संदेश मिळाला का? यावर निखत म्हणाली, कोण भाई (भाऊ), तुमचा भाऊ…. भाई तो दुसऱ्यांसाठी असेल माझ्यासाठी जीव की प्राण आहे….

त्यानंतर सलमानने निखतला या क्लिपसोबत अभिनंदनाचा संदेश पाठवला. ज्यावर बॉक्सिंग चॅम्पियनने प्रतिक्रिया देत म्हटले की, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. सलमान खानने माझ्यासाठी ट्वीट केल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. माझा विजय विशेष बनविण्याकरिता आभार! ही आठवण कायम स्मरणात जपून ठेवेन….!

त्यानंतर दबंग खानने निखतला आणखी एक ट्वीट केले ज्यात त्याने लिहिले की, बस मला नॉक आउट करु नकोस. खूप सारे प्रेम. तू जे काही करते आहेस, ते तसेच करत राहा आणि माझ्या हिरो सिल्वेस्टर स्टॅलोन सारखे ठोसे मारत राहा.