कोणत्याही खान सोबत अथवा मोठया बॅनरचे चित्रपट के...

कोणत्याही खान सोबत अथवा मोठया बॅनरचे चित्रपट केले नाही, तरी मी आहे टॉपची अभिनेत्री – कंगना रणावतने मारली फुशारकी (Without Any Khan Or Big Banner; I Am The Actress On Top – Kangana Ranaut’s New Panga)

आली लहर केला कहर, ही म्हण सार्थ करणारी कंगना रणावतचा स्वभाव आहे. कुणाची तरी कुरापत काढल्याशिवाय किंवा नको त्या वादात उडी घेतल्याशिवाय तिला चैन पडत नाही. खळबळजनक विधाने करण्यात तर तिचा हात कोणीच धरू शकणार नाही. असंच एक विधान नुकतंच कंगनाने केलं आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
एका मुलाखतीत ती म्हणते की, ऑफबीट आणि समांतर सिनेमामध्ये कामे करून मी मुख्य प्रवाहाची स्टार बनले आहे. “मी कधीही राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साली, धर्मा प्रॉडक्शन व यशराज फिल्मस  अशा बडया बॅनर्सच्या चित्रपटातून भूमिका केलेल्या नाहीत किंवा कोणत्याही खान सोबत नायिका म्हणून काम केले नाही. तरीपण आघाडीच्या अभिनेत्रीं मध्ये एक टॉपची अभिनेत्री बनली आहे.” अशी फुशारकी कंगनाने या मुलाखतीत मारली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
 कंगनाने ही शेखी मिरवली असली तरी ती वास्तविकता आहे. असच म्हटलं पाहिजे कारण तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ४ खेपेस नॅशनल अवॉर्ड मिळवले आहे. शिवाय तिला पद्मश्री प्रदान करण्यात आलीय. झांशी की रानी, थलाइ वी यासारख्या चरित्रात्मक चित्रपटात तिने कमालीचा अभिनय केला आहे. कंगना आहे तशी गुणाची, पण बोलता बोलता तिची गाडी घसरते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

आता हेच बघा ना ! या मुलाखतीची सुरुवात ‘द डर्टी पिक्चर’ च्या उल्लेखाने झाली होती. विद्या बालनने जी भूमिका केली, त्याची ऑफर आपल्याला आली होती, असं कंगनाने सांगितले. आपण या रोलमध्ये फिट बसत नसल्याचं मला वाटलं असं ती म्हणाली. त्याचबरोबर तिने या भूमिकेबद्दल विद्या बालनची खूप तारीफ केली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम