बिग बॉस मराठीनंतर शिव ठाकरेचा हिंदी बिग बॉसमध्य...

बिग बॉस मराठीनंतर शिव ठाकरेचा हिंदी बिग बॉसमध्येही बोलबाला (Winner Of Marathi Big Boss 2, Shiv Thackeray Is Making Headlines In Hindi Big Boss 16)

बिग बॉस मराठीचा 4 था सीजन आणि बिग बॉस हिंदीचा 16 वा सीजन सध्या टीव्हीवर जोरदार सुरु आहे. या शोमध्ये कोण कोणावर मात करेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. बिग बॉस मराठी सीजन 2 चा विजेता ठरलेला शिव ठाकरे यंदा बिग बॉस हिंदी गाजवत आहे. सोशल मीडियावर सुद्धा सगळीकडे शिव ठाकरेचाच बोलबोला आहे. मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये सुद्धा त्याने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालवले जात आहे.

याआधी शिव ट्विटरवर प्रियांका चाहर चौधरी आणि सुंबूल तौकीर खान यांचा रेकॉर्ड मोडत १ मिलियन ट्विटसने ट्विटरवर ट्रेण्डिंगला होता. आता पुन्हा एकदा शिवने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. शिव असा पहिलावहिला स्पर्धक ठरला आहे, ज्याच्यासाठी २ मिलियन ट्वीट्स करण्यात आले आहेत. त्याच्या चाहत्यांनी REIGN OF SHIV THAKARE हे वाक्य ट्रेंड केले आहे. #ShivThakare असा हॅशॅटगही ट्रेंड होत आहे. शिव ठाकरे बिग बॉस १६ च्या या आठवड्यात कॅप्टन झाल्यानंतर REIGN OF SHIV THAKARE ट्रेंड झाले आहे.

बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीही शिवचे कौतुक केले. बिग बॉसमध्ये खेळलेला मनू पंजाबी म्हणतो की, प्रियांकासारखे स्पर्धक शिवसोबत मुद्दाम भांडण करून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान बिग बॉस सीझन ६ ची विजेती उर्वशीनेही शिवला ‘स्मार्ट स्पर्धक’ म्हटले होते. याशिवाय फैजल खान, शेखर सूमन, मेघा धाडे, किशोरी शहाणे या कलाकारांनीही शिवला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे.