बिग बॉसमधून बाहेर पडताच विजेता अक्षय आणि उपविजे...

बिग बॉसमधून बाहेर पडताच विजेता अक्षय आणि उपविजेती अपुर्वाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु(Winner Akshay and runner-up Apurva started throwing accusations at each other as soon as they exited Bigg Boss)

दोन दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडला. गेले तीन महिने चाललेल्या चुरशीच्या लढतीत अक्षय केळकर, अपूर्वा नेमऴेकर, राखी सावंत, किरण माने, अमृता धोंगडे हे फायनलिस्ट होते. यांच्यामध्ये अक्षय केळकर विजेता तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली.

शोच्या सुरुवातीला एकमेकांचे घट्ट मित्र असलेले अपूर्वा आणि अक्षय शोच्या शेवटी मात्र एकमेकांच्या विरुद्ध खेळू लागले. त्यांच्यात खटके उडू लागले होते. पण महाअंतिम सोहळ्यात टॉप 2 मध्ये पोहचल्यावर दोघांनी एकमेकांना मिठी मारुन आपापसातील भांडण संपवले असे वाटू लागले होते.पण घराबाहेर पडल्यावर मात्र त्यांनी मुलाखतींद्वारे पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.

बिग बॉसच्या घरात एका टास्कनंतर अक्षयने अपूर्वाला स्वार्थी असे म्हटले होते. त्यावरुन त्यांच्यात खटके उडाले होते. पण आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यावरही अपूर्वा स्वार्थी असल्याचे म्हटले आहे. यावर आता अपूर्वानेही आपले प्रतिउत्तर दिले आहे.

अपूर्वा म्हणाली की, “मला अक्षय स्वार्थी असं म्हणाला, तेव्हा मला त्याचा फार त्रास झाला होता. अक्षयने मला नॉमिनेट करुन अमृता धोंगडेला सेफ केलं होतं. तू फेअर खेळतोस तर तसेच खेळ. कारण तुझं हे मत मला तरी पटलेलं नाही, असे सांगितले होते. मी फार स्ट्राँग आहे हे त्याला माहिती आहे. त्याला माझे पॉझिटीव्ह नेगेटिव्ह पॉईंट माहिती होते. पण त्याने निकषांमध्ये बसवून मला नॉमिनेट केले हे मला समजले. बिग बॉसच्या घरात फक्त तो एकमेव माझं मित्र होता. पण जेव्हा भांडण झालं तेव्हा मी फार खचले होते.

त्याने मला स्वार्थी हा टॅग दिलंय, पण त्याचं ते बोलणं मला मनाला फार लागलं होतं. म्हणून मला त्याच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर तो मला त्याबद्दल सॉरीही बोलला होता. पण जर आताही तो मला स्वार्थी बोलत असेल तर मग तेव्हा प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी किंवा माझं मन जिंकण्यासाठी तो सॉरी बोलला का? मग ते सॉरी कशासाठी होते? जर तो फक्त यासाठी सॉरी बोलत असेल तर आज त्याने आमच्या मैत्रीची लाज काढली. आजही जर तो मला स्वार्थी बोलत असेल तर मला कमाल वाटते”,असे अपूर्वाने यावेळी म्हटले.