पोट वाढण्याची कारणे व उपाय (Why Tummy Size Beco...

पोट वाढण्याची कारणे व उपाय (Why Tummy Size Becomes Large And How To Control It)

पोट वाढण्याची अनेक कारणे आहेत. पोट वाढणे हे प्रगतीचे लक्षण आहे असे एकेकाळी समजले जात होते. खरे पाहिले तर पोट वाढल्याने खूप नुकसान होऊ शकते. ते कसे होऊ शकते व त्यावर उपाय काय करावे, याबाबत मसिना हॉस्पिटल, भायखळा येथील क्षयरोग आणि श्वसन रोग तज्ज्ञ डॉ. सुलेमान लधानी यांनी केलेले मार्गदर्शन.

पोट वाढल्याने हृदयविकाराचा धोका, तणाव वाढणे,  मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पोट वाढण्यापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे.

पोट का वाढते? पोट वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. याचे पहिले कारण म्हणजे जर तुमचे जेवण योग्य नसेल आणि तुमची जीवनशैली योग्य नसेल तर तुमचे पोट वाढू लागते. आणि तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होते. आहार योग्य नसेल तर अन्न पचवण्याची शक्ती नष्ट होते. त्यानंतर जमा होणारी चरबी जाळणे कठीण होते. त्यामुळे पोट वाढू लागते.

चुकीचा आहार

तळलेले अन्न जास्त खाणे, साखरयुक्त पदार्थांचे अधिक सेवन,  एरेटेड पेये – कॅन, ज्यूस या सर्वांचा दैनंदिन जीवनात अति वापर झाल्यामुळे वजन वाढते. पुरेशी झोप न मिळणे. काही वेळा आनुवंशिकता देखील लठ्ठपणाचे कारण असू शकते आणि दुसरे महत्त्वाचे कारण – जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्य सेवन केले तर तुमच्या यकृताला सूज येऊ शकते,  ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोटात पाणी भरते आणि तुमचे पोटही वाढू शकते. फक्त दारू प्यायल्याने सुद्धा तुमचे वजन वाढू शकते.

तिसरे आणि सर्वात सामान्य कारण – शरीराला व्यायाम नसणे. वर्क फ्रॉम होम, दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसणे आणि व्यायाम न केल्यामुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होऊन लठ्ठपणा किंवा पोट वाढू शकते. या कारणास्तव आपण जितके खातो तितक्या कॅलरीज बर्न करणे देखील आवश्यक आहे.

आणि एक सामान्य कारण म्हणजे तणाव, जास्त तणावाखाली राहिल्याने तुमचा कोर्टिसोल हार्मोन वाढतो जो तुम्हाला तणावाचा सामना करण्यास मदत करतो आणि जेव्हा तुमची तणावाची पातळी वाढते तेव्हा हा हार्मोन तुमच्या चयापचयाचा वेग कमी करतो, ज्यामुळे तुमच्यामध्ये जास्त कॅलरीज राहतात. पोट आणि चरबी जळत नाही, त्यामुळे ती विशेषतः पोटात राहते, त्यामुळे लठ्ठपणा / पोट वाढू शकते.

लठ्ठपणा / पोट कमी करण्यासाठी काय करावे?

• सकस आहार घेणे.

• अन्नामध्ये जास्त प्रथिने असणे.

• साखर आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा.

• वेफर्स, एरेटेड ड्रिंक्स, केक, जंक फूड यांचा कमी वापर.

• अधिक पोषण मिळेल असे पदार्थ – भाज्या, फळे जास्त प्रमाणात खावी.

• दारूचे सेवन करू नका.

• चांगली झोप घ्या.

• तणावमध्ये राहू नका – तणाव कमी करण्यासाठी ध्यान / योगा करू शकता.

• आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.