टी.व्ही. सिरियल्सना डेली सोप कां म्हणतात? माह...

टी.व्ही. सिरियल्सना डेली सोप कां म्हणतात? माहीत आहे का तुम्हाला? (Why T.V. Serials Are Known As Daily Soap)

टेलिव्हिजन वर चॅनल्स आणि या चॅनल्सवर मालिकांचा  सुळसुळाट झालेला आहे. करोनाच्या महामारीत सिनेमा थिएटर्स पूर्णपणे बंद असल्याने टी.व्ही. मालिका पाहण्यावाचून गत्यंतर उरले नाही. कित्येक घरातील लोकांना या मालिकांचे जबरदस्त गारुड झाले आहे. दैनंदिन मालिकांमध्ये कौटुंबिक समस्यांचं दळण  घातलं जात असलं तरी त्यांच्या वाचून करमत नाही, अशी  अनेक प्रेक्षकांची अवस्था आहे. या दैनंदिन मालिकांना ‘डेली सोप’ कां  म्हणतात, माहित आहे का तुम्हाला?
ही गोष्ट फार जुनी आहे. अमेरिकेमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘ऑपेरा’ या रंगमंचीय कार्यक्रमाने टी . व्ही.  जगतात पदार्पण केले तेव्हा त्याची लोकप्रियता पाहून त्या कार्यक्रमांना साबण बनविणाऱ्या कंपन्यांनी प्रायोजित (स्पॉन्सर)करायला सुरुवात केली. एकामागून एक या साबण कंपन्यांनी हे ऑपेराज स्पॉन्सर करायला सुरुवात केली. साबण कंपन्यांमध्ये तू का मी, अशी मोठया प्रमाणावर स्पर्धा सुरु झाली.
ही भयंकर स्पर्धा पाहून या ऑपेराजचे नाव सोप ऑपेरा असे पडले. तेव्हापासून टेलिव्हिजन वरील प्रायोजित कार्यक्रमांना सोप म्हटले जाऊ लागले. पुढे त्याचे ‘डेली सोप ‘ असे नामकरण झाले.
मजेची गोष्ट म्हणजे या प्रकारच्या कार्यक्रमांना स्पॉन्सर करण्यात आजही साबण कंपन्याच आघाडीवर आहेत. इतर कार्यक्रमांना इतर कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिरात करायला प्रायोजित करत आल्या तरी सर्वच कार्यक्रमांना ‘डेली सोप ‘म्हणण्याचा प्रघात पडला आहे.

T.V. Serials, Daily Soap