सुश्मिता सेनेला या कारणास्तव चित्रपट मिळत नव्ह...

सुश्मिता सेनेला या कारणास्तव चित्रपट मिळत नव्हते…. तिनं व्यक्त केलेला सल …. (Why Sushmita Sen Was Not Getting Films : The Actress Expressed Her Pain)

आपण गेल्या १० वर्षांपासून चित्रपटात काम केलेलं नाही, असं सुश्मिता सेनने एका मुलाखतीत सांगितलं. तिला बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे झालीत. तरीपण ही बेकारी कां आली असावी?

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘आर्या’ या वेब सिरीझमधून सुश्मिता पुन्हा पडद्यावर झळकली आहे. आपण ज्या पद्धतीच्या भूमिका करू पाहत होतो, त्या मिळत नव्हत्या म्हणून मी सिनेमापासून लांबच राहिले, असं ती सांगते.
२०१० साली आलेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या विनोदी चित्रपटात सुश्मिताचे शाहरुख आणि फरदीन खान असे दोन नायक होते. नंतर तिने दत्तक घेतलेल्या दोन मुलींच्या संगोपनावर आपलं लक्ष केंद्रित केलं. कामापायी मुलींच्या पालनपोषणाकडे दुर्लक्ष होऊ नये, ही तिची मनीषा होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
आपल्या हंगामी संन्यासाबाबत स्पष्ट करताना सुश्मिताने सांगितले की, १० वर्षे मी आपल्या मौल्यवान चीजा सांभाळत राहिले. मला हव्या असलेल्या भूमिका मिळत नव्हत्या. एकाच साच्यातील भूमिका मिळत होत्या म्हणून मी लांब राहिले.
आपण कदाचित लोकांशी नेटवर्क जोडण्यात असफल ठरलो असावे, असे सांगून सुश्मिता म्हणते, “माझे नेटवर्किंग चांगले नाही. त्यामुळे मला जमलं नाही.” ‘आर्या’ या वेब सीरिजचे दोन सिझन आले आहेत. अन तिसऱ्या सीझनचे शूटिंग चालू आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम