काय कारण असेल की शर्मिला टॅगोरने अजून आपल्या नव...

काय कारण असेल की शर्मिला टॅगोरने अजून आपल्या नव्या नातवाचं तोंडही पाहिलं नाही? (Why Sharmila Tagore Has Not Yet Seen Her Newborn Grandchild, The Reason Revealed)

दुसऱ्यांदा नवा पाहुणा आल्यापासून करीना आणि सैफच्या घरी आनंदीआनंद आहे. पतौडी आणि कपूर असे दोन्ही कुटुंबिय खूप खूश आहेत. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांनी करीना-सैफला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. मित्र-मैत्रीणी, बॉलिवूड सेलिब्रेटी आणि नातेवाईक यांची रोजच्या रोज बाळाला पाहण्यासाठी गर्दी होतेय ती वेगळीच. परंतु तुम्हाला माहीत आहे का, अजून बाळाच्या आजीने अर्थात शर्मिला टॅगोर-पतौडीने आपल्या नातवाला पाहिलेलं नाही. काय कारण असेल की शर्मिलाने अजून आपल्या नातवाचं तोंडही पाहिलं नाही?…

करीना-सैफच्या जवळचे मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, सोहा खान, कुणाल खेमूसह अनेक कलाकार करीनाच्या नव्या नवाबास पाहून आले. एवढंच काय पण सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान देखील करीनाच्या बाळासाठी गिफ्टस्‌ घेऊन गेली होती, परंतु सैफची आई आणि बाळाची आजी मात्र नातवाला पाहण्यास गेल्याचे कोणीच पाहिलं नाही.

त्याचं असं झालंय की. सध्या शर्मिला टॅगोर आपल्या दिल्ली येथील घरी आहे. आणि दिवसेंदिवस कोरोनाच्या केसेसही वाढत आहेत. हे पाहता तिने व तिच्या कुटुंबियांनी काही दिवस तिने तेथेच राहावे असा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवास करणे तर धोक्याचे आहेच. मग उगीच रिस्क कशाला असं म्हणून शर्मिला टॅगोर आता दिल्लीलाच आहे. आणि म्हणूनच आपल्या नातवालाही तिने अजून पाहिले नाही. पण लवकरच आजी आपल्या नातवाला भेटायला येणार असल्याचे बोलले जात आहे.

शर्मिला टॅगोर येथे नसल्यामुळे नव्या पाहुण्याचं नाव काय ठेवायचं, हे देखील अजून ठरायचं आहे. करीना -सैफच्या या दुसऱ्या नवाबाचं नाव करीनाची आई बबिता ठेवणार असल्याचं बोललं जात आहे. नामकरणाला शर्मिला टॅगोरची उपस्थितीही आवश्यक असल्यामुळे तैमूरच्या भावाचे नाव कळायला अजून काही दिवस तरी फॅन्सना थांबावं लागणार आहे. करीनाच्या डिलेव्हरीनंतर ट्विटरवर ‘बाबर’ आणि ‘औरंगजेब’ अशा नावांचा जोरात ट्रेंड सुरू होता. यावरून लोकांनी करीना-सैफला बरंच ट्रोलही केलं होतं.

करीना नि सैफ आता दुसऱ्यांदा आई-वडिल झाले आहेत. सध्या कपूर व पतौडी दोन्ही कुटुंबात जरी जल्लोषाचं वातावरण असलं तरी करीनानं आपल्या नव्या बाळाला अजून मीडियासमोर आणलेलं नाही आणि त्याचे फोटोही शेअर केलेले नाहीत. उभयतांनी तैमूरच्या वेळेस जी चूक केली होती ती त्यांना पुन्हा करायची नाहीये. आणि म्हणूनच बाळाला अजून त्यांनी मीडियासमोर आणलेलं नाही.