रणबीर कपूर लेकीसाठी कापत नाही दाढी, अभिनेत्याने...

रणबीर कपूर लेकीसाठी कापत नाही दाढी, अभिनेत्यानेच सांगितले कारण (Why Ranbir Kapoor is not shaving his beard? Actor’s reply will melt your heart- ‘I fear Raha won’t recognise me…’)

गेली चार वर्षे इंडस्ट्रीपासून दूर असलेला रणबीर या दोन वर्षांत नव्याने उभा राहत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपट करत आहे. शिवाय तो एका मुलीचा बाबा सुद्धा झाला आहे. अभिनेता, मुलगा, पती, वडील अशा चारही भूमिका रणबीर सध्या उत्तमरित्या पेलत आहे.  लेक राहाने त्याच्या आयुष्यावर असा काही कब्जा केला. की तो जिथे जातो तिथे आपल्या लेकीबद्दल भरभरुन बोलत असतो. त्याच्या चाहत्यांनासुद्धा या बापलेकीचे नाते जाणून घेण्याची उत्सुकता असते.

रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच रणबीर कपूर ‘इंडियन आयडॉल 13’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता, रणबीरने शोमध्ये मुलगी राहाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.

‘इंडियन आयडॉल 13’ या शोमध्ये रणबीरला एका छोट्या स्पर्धकाने अतिशय गोंडस प्रश्न विचारला होता की, तुमची मुलगी राहाला तुमची दाढी टोचत नाही का? यावर रणबीरने दाढी न करण्याचे दिलेले कारण चाहत्यांना खूपच आवडले. दाढी न कापण्याचे कारण सांगताना रणबीर म्हणाला, “मी माझ्या एका चित्रपटासाठी ही दाढी वाढवली आहे. माझी मुलगी राहाचा जन्म झाल्यापासून ती मला फक्त या लूकमध्ये पाहते. आता मला भीती वाटत नाही की माझी दाढी तिला टोचेल, मला भीती वाटते की मी दाढी केल्यावर ती मला ओळखणार नाही.

रणबीर पुढे म्हणाला, “तिला फक्त माझ्या डोळ्यांकडे पाहून हसण्याची सवय आहे आणि मला विश्वास आहे की तिने माझ्या डोळ्यांच्या खाली कधी पाहिलेले नाही. मला खात्री आहे की ती माझा क्लीन शेव्हन लूकही ओळखेल, पण जर तिने मला ओळखले नाही तर माझे मन दुखावले जाईल.”

याआधी रणबीर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता, तेव्हाही त्याने राहाविषयी अनेक सुंदर गोष्टी सांगून चाहत्यांची मने जिंकली होती.

रणबीर कपूरने एप्रिल 2022 मध्ये आलिया भट्टसोबत लग्न केले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये दोघांनीही आपल्या आयुष्यात मुलगी राहाचे स्वागत केले. राहा आता तीन महिन्यांची आहे. रणबीर आणि आलियाने अद्याप राहाचा चेहरा जगासमोर दाखवलेला नाही. त्यांनी पापाराझींनाही विनंती केली आहे की परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी राहाची फोटो क्लिक करू नयेत, पण विशेषत: रणबीर अनेकदा सार्वजनिक प्लॅटफॉर्म आणि कार्यक्रमांमध्ये राहाविषयी बोलताना दिसतो. रणबीरच्या ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटाविषयी बोलायचे तर हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होत आहे. लव रंजन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूर आहे.