कोविडच्या संसर्गातून मुक्त झाल्यावर टूथब्रश बदल...

कोविडच्या संसर्गातून मुक्त झाल्यावर टूथब्रश बदलावा का? तज्ज्ञ काय म्हणतात? (Why One Must Change Toothbrush After Recovering From Covid- 19 : Know What Experts Say)

करोनाचा वाढता संसर्ग अनेक प्रश्न निर्माण करत आहे. त्याचबरोबर करोनाच्या विळख्यातून सुटका झाल्यावर काय काळजी घ्यावी, याबाबतही लोकांच्या मनात संभ्रम आहेत. मौखिक आरोग्य हा त्यापैकी एक मुद्दा आहे.

मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्याल?

वैद्यकीय तज्ज्ञांचं असं मत आहे की, करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मौखिक आरोग्याची काळजी घेणं तेव्हढंच आवश्यक आहे. विशेषतः तुम्हाला त्याचा संसर्ग झाला असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्यावे. अन्‌ त्याच्या विळख्यातून मुक्तता झाली तरी तिकडे दुर्लक्ष करू नका. यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा टूथब्रश लगेच बदलला पाहिजे.

पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून लगेच टूथब्रश बदला

डेंटिस्टच्या मते जी व्यक्ती कोविड १९ च्या संसर्गातून मुक्त झाली असेल तिने नवीन टूथब्रश घेतला पाहिजे. म्हणजे त्याचा संसर्ग पुन्हा होण्याची भिती पुष्कळशी कमी होईल. शिवाय एकच प्रसाधनगृह वापरत असल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची जोखीम पण कमी होईल.

सर्दी, खोकला, फ्लू झालेल्यांनी देखील मौखिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे

करोनाच्या आधीपासून अस्तित्वात असलेले सर्दी, खोकला, फ्लू हे रोग संसर्गजन्य आहेत. त्यामुळे या रोगांमधून बरे झालेल्या व्यक्तींनी देखील आपला टूथब्रश बदलला पाहिजे. त्यामुळे इतर लोकांना संसर्ग होण्याचा धोका बराच कमी राहील.

कोविड झाल्यावर किती दिवसांनी ब्रश बदलावा?

एखाद्या व्यक्तीला कोविड १९ ची बाधा झालीच, तर लक्षणे दिसल्यानंतर २० दिवसांनी टूथब्रश आणि टंग क्लिनर बदलले पाहिजेत. डॉक्टरांचा यावर असा सल्ला आहे की, ”आपल्या टूथब्रशवर बॅक्टेरिया किंवा व्हायरस शिल्लक राहू शकतो. जो नंतर श्वसन मार्गाच्या इन्फेक्शनला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळेच सर्वच संसर्गमुक्त रोग्यांना आम्ही टूथब्रश बदलण्याचा सल्ला देतो.”

या गोष्टींची पण काळजी घ्या

डेंटिस्टनी दिलेला सल्ला आचरणात आणाच. पण याही गोष्टींची काळजी घ्या.

-तोंडाच्या आरोग्यासाठी माऊथवॉशचा वापर करा.

-माऊथवॉश नसेल तर गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करा.