कोणत्या सिनेमासाठी करिनाने पहिल्यांदाच दिली ऑडि...

कोणत्या सिनेमासाठी करिनाने पहिल्यांदाच दिली ऑडिशन? (Why Karina appeared for audition?)

बेबो करिना कपूरला आपल्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदाच ऑडिशन द्यावी लागली. आश्चर्य वाटले ना? परंतु हे शंभर टक्के खरं आहे. करिनाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे केले आहेत. असे असताना असा कोणता चित्रपट येतोय की ज्यासाठी करिनाला ऑडिशन द्यावी लागली असेल. तर तो चित्रपट आहे, ‘लाल सिंह चड्ढा’. आमिर खान स्टारर हा सिनेमा असून आमिरने स्वतः बेबोला फोन करून या सिनेमाची कथा ऐकण्यासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर करिनाने सिनेमाची स्क्रिप्ट ऐकली. एवढंच नव्हे तर स्क्रिप्ट वाचून आमिर व करिनानं एकत्र एक सीनही केला. सीन करून झाल्यानंतर करिनाच्या लक्षात आलं की ती सिनेमासाठीची ऑडिशन होती. कदाचित आमिर खान
आपल्या निवडीबाबत शंभर टक्के खात्री करून घेऊ इच्छित असणार, असं तिनं म्हटलं आहे. अनेक ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. ‘फॉरेस्ट गंप’ या सिनेमामध्ये टॉम हँक्स आणि रॉविन राइड हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याचा हिंदी रिमेक लाल सिंग चड्ढा साठी आमिर खानने २० किलो वजन कमी केलं आहे. अद्वैत चंदन या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. करिना कपूर सध्या प्रेग्नंट आहे. त्यामुळे ऑडिशन जरी दिली तरी करिना या सिनेमाच्या शुटिंगसाठी वेळ देऊ शकेल का? हा प्रश्नच आहे.