भारताला मधुमेहाची राजधानी कां म्हटले जाते? (Wh...

भारताला मधुमेहाची राजधानी कां म्हटले जाते? (Why India Is Considered World’s Diabetic Capital : Explains Endocrynology Consultant)

संपूर्ण जगात मधुमेहाचा आजार झपाटयाने पसरत आहे. आत्ताच्या घडीला जगभरात वयस्क मधुमेहींची संख्या ५३७० लाख असून २०३० सालापर्यंत ती ६४३० लाखांवर पोहचेल, असे अनुमान आहे. भारत या रोगामध्ये अग्रेसर आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार , भारतात ७७० लाखांहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त असून २०४५ सालापर्यंत ती १३४० लाख होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळेच भारताला ‘जगाची मधुमेह राजधानी ‘ म्हटले जाते. ही माहिती नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट  एंडोक्रिनॉलॉजिस्ट , डॉ. महेश चव्हाण यांनी दिली आहे.

डॉक्टर पुढे म्हणतात की , मधुमेहामुळे अकाली मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. या रोगाचा परिणाम रुग्णाच्या कार्यक्षमते वर होतो. त्यातून दृष्टिदोष होण्याचाही धोका असतो. असे असले तरी मधुमेहाबाबत जागरूकता ठेवली पाहिजे.

काळजी, देखभाल आणि स्वतःचे आरोग्य यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात, गुंतागुंत तसेच मधुमेहामुळे निर्माण होणारे एकंदरीत आर्थिक ओझे कमी करण्याबाबत जागरूकता, माहिती तंत्रज्ञान व टेलिमेडिसिन या सर्वांची खूप मदत होऊ शकते. या सर्वांची अमंलबजावणी योग्य प्रकारे व सक्षमतेने करण्यात आल्यास मधुमेह व त्या निमित्ताने इतर गंभीर धोके टाळण्यात व त्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल.