अमिताभ बच्चनने अद्याप लस टोचून का घेतली नाही?&#...

अमिताभ बच्चनने अद्याप लस टोचून का घेतली नाही?…. स्वतःच केला खुलासा (Why Has Amitabh Bachchan Not Taken Covid 19 Vaccine Yet, He Clarifies)

देशभरात करोना बाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. धर्मेन्द्र, हेमा मालिनी, जितेन्द्र, शर्मिला टागोर, कमल हासन अशा अनेक ज्येष्ठ नागरिक असलेल्या बॉलिवूड सिताऱ्यांनी ही लस घेतली आहे. पण महानायक अमिताभ बच्चनने अद्याप घेतलेली नाही.

अमिताभ ७८ वर्षांचा आहे. त्याच्या आरोग्यविषयक समस्या आणि वय पाहता तो रिस्क झोनमध्ये आहे. तरीपण त्याने लस का घेतली नाही, याबद्दल त्याने आपल्या ब्लॉगवर खुलासा केला आहे.

अलीकडेच त्याचे डोळ्याचे ऑपरेशन झाले. तेव्हा त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केल्या होत्या. त्याबद्दल आभार मानून अमिताभ ब्लॉगमध्ये लिहितो – “या व्हायरसची भिती तर वाटतेच आहे. त्यामुळे लस घेणे अनिवार्य आहे. तेव्हा माझे डोळे बरे होताच, मला रांगेत उभं राहावं लागेल… तब तक दुनिया अजब है.”

गेल्याच महिन्यात अमिताभच्या एका डोळ्याला आजार जडला होता. त्याचे ऑपरेशन करावे लागले. नंतर गेल्या आठवड्यात दुसऱ्या डोळ्याचेही ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे दोन्ही डोळे बरे झाल्यावर लस घेण्याचे संकेत बिग बी ने दिले आहेत.

गेल्या वर्षी अमिताभ आणि अभिषेक – ऐश्वर्या – आराध्य करोनाग्रस्त झाले होते.

रूमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटात अमिताभ काम करत आहे. इमरान हाश्मी व रिया चक्रवर्ती त्याच्या सोबत आहेत. अजय देवगण दिग्दर्शन करत असलेल्या ‘मे डे’ या चित्रपटासह झुंड, तेरा यार हूं मै, ब्रह्मास्त्र या चित्रपटातही अमिताभ काम करत आहे.

विशेष म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हज्‌च्या २०२१ सालचा सन्मान अमिताभला मिळाला आहे. हा सन्मान मिळविलेला अमिताभ पहिलाच भारतीय कलाकार आहे.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा