या कारणामुळे दीपिका कक्कडने लपवली होती आपल्या ग...

या कारणामुळे दीपिका कक्कडने लपवली होती आपल्या गर्भधारणेची बातमी, व्हिडिओ शेअर करून सांगितले कारण (Why Dipika Kakar Hide Her Pregnancy, Shoaib Ibrahim Reveals The Reason In Their Latest Vlog, Says- We Were Scared, Their Family Advised Them….)

दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या सुमारे 5 वर्षानंतर पालक बनणार आहेत. काल स्वत: शोएब इब्राहिमने पत्नी दीपिकासोबतची ही गोड बातमी खास पद्धतीने सोशल मीडियावर शेअर केली. दीपिका आणि शोएब आईबाबा होणार असल्यामुळे खूप आनंदी आहेत, ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर त्यांचे चाहते देखील खूप उत्साहित आहेत. तसेच ते सतत कमेंट करून दोघांचे अभिनंदन करत आहेत. दीपिका आणि शोएबने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांसमोर आपला आनंद व्यक्त केला आहे, तसेच त्यांनी चाहत्यांपासून प्रेग्नेंसी लपवल्याचेही सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका कक्कड तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. दीपिका गरोदर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये सुरू होती. अभिनेत्रीचे बाहेर चाट खायला जाणे असो, काही पदार्थ खाणे टाळणे असो, वहिनीच्या लग्नात नाचणे असो किंवा दीपिकाचे वजन थोडे वाढलेले दिसणे, चाहते प्रत्येक गोष्टीचा संबंध तिच्या प्रेग्नंसीशी जोडत होते, पण या जोडप्याने याबाबत काहीच माहिती दिली नाही. पण आता दीपिका आणि शोएबने ही आनंदाची बातमी काल सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली.

टीव्हीच्या या पॉवर कपलने चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. त्यात त्यांनी इतके दिवस गर्भधारणा का लपवली याचे कारण सांगितले. व्हिडिओमध्ये शोएबने सांगितले की, दीपिका 3 महिन्यांची गर्भवती आहे. आणि काही खास कारणांमुळे त्यांनी इतके दिवस ही आनंदाची बातमी शेअर केली नाही. दीपिकाने सांगितले की, घरातील वडीलधाऱ्यांनी, तीन महिने पूर्ण होईपर्यंत ही गोष्ट कोणाशीही शेअर करू नका असे सांगितले होते.

याशिवाय शोएबने सांगितले की, दीपिकाचा गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गर्भपात झाला होता.  यामुळे आम्ही घाबरलो होतो आम्हाला सर्व खबरदारी घ्यायची होती. याशिवाय शोएबने असेही सांगितले की दीपिकाला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. याच कारणामुळे तिला शाबाच्या वाढदिवसालाही डान्स करता आला नाही. यावेळी आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. म्हणूनच जेव्हा आम्हाला डॉक्टर आणि कुटुंबीयांकडून ग्रीन सिग्नल मिळाला तेव्हा आम्ही ही आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली.

सध्या दीपिका आणि शोएब आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा एन्जॉय करत आहेत आणि खूप आनंदी आहेत.  चाहत्यांना ही आनंदाची बातमी कळल्यापासून ते त्यांच्या आवडत्या जोडप्याचे सतत अभिनंदन करत आहेत.