प्रीती झिंटाने प्रियंका चोप्राला दिलेली घर तोडण...

प्रीती झिंटाने प्रियंका चोप्राला दिलेली घर तोडणारी अशी उपमा, जाणून घ्या काय आहे कारण(Why did Preity Zinta Call Priyanka Chopra ‘House Breaker’, This Story is Related to King Khan)

बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींमधील कॅटफाईट हा सध्याच्या काळातील सर्वसामान्य विषय झाला आहे. परंतु अभिनेत्रींच्या कॅटफाइटपेक्षाही इंडस्ट्रीमध्ये लिंकअप, ब्रेकअप आणि विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या खूप प्रसिद्ध होतात. इंडस्ट्रीतही अनेक अभिनेत्रींनी कोणाचे तरी घर उद्ध्वस्त करून आपला संसार मांडला आहे, तर काही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी वेळीच योग्य खबरदारी घेऊन आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. प्रियांका चोप्राचे नाव इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले असले तरी काही वर्षांपूर्वी प्रीती झिंटाने देसीगर्लला घरे तोडणारी महिला म्हटले होते. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही गोष्ट शाहरुख खानशी संबंधित आहे.

जेव्हा 12 वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खानच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यादरम्यान प्रीती झिंटाला किंग खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या कथित अफेअरबद्दल विचारले असता तिने आपली प्रतिक्रिया दिली. प्रियंकाचे नाव न घेता तिने प्रियांकाला हाऊस ब्रेकर म्हटले होते. त्याचवेळी प्रियांकासोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे वैतागून गौरी खानने शाहरुख खानला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते.

2006 मध्ये प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान ‘डॉन’ चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यानंतर 2011 मध्ये ‘डॉन 2’ या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. असे म्हटले जाते की, या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असतानाच दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि त्यांच्या कथित अफेअरच्या बातम्या वणव्यासारख्या पसरू लागल्या. गौरी खानला जेव्हा हे समजले तेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आले आणि ती खूप अस्वस्थ झाली. यानंतर गौरीने किंग खानला बजावले होते की, तो प्रियंकासोबत पुन्हा काम करणार नाही.

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरच्या अफवा खूप उडाल्या, पण त्यांच्यात खरे नाते आहे की नाही याचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही. शाहरुख आणि प्रियांकाने त्यांच्या अफेअरच्या बातम्यांवर कधीही प्रतिक्रिया दिली नसली तरी प्रियांकामुळे शाहरुख आणि गौरी यांच्यातील वाद नक्कीच वाढला. अशा नाजूक परिस्थितीत गौरीने आपले लग्न वाचवण्याचा निर्णय घेतला आणि शाहरुखला प्रियांकासोबत पुन्हा कधीही काम न करण्याचा सल्ला दिला आणि तेव्हापासून प्रियांका-शाहरुख कधीच एकत्र दिसले नाहीत.

विशेष म्हणजे प्रीतीझिंटाला एका मुलाखतीत प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खानच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले होते की, इतर लोकांची घरे तोडणाऱ्या महिलांबद्दल माझे मत खूप कमी आहे. प्रीती म्हणाली होती की, ती अशा अभिनेत्रींचा तीव्र तिरस्कार करते, ज्या स्टार्सला चिकटून राहतात, जे पुरुषांना शिडीप्रमाणे वापरतात. त्यावेळी प्रीती झिंटाच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता.