अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत लग्न करण्याचे ...

अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत लग्न करण्याचे कारण केले स्पष्ट (‘Why Did I Marry Jaya ?’Amitabh Bachchan Reveals The Secret Of Their Marriage)

बॉलिवू़डमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना आदर्श जोडपे मानले जाते. दोघांनीही इतकी वर्षे सुखाचा संसार करुन नात्यात आणि कामात समतोल राखता येतो,  हे इतर कलाकारांना दाखवून दिले आहे. बिग बी सध्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसत आहेत. तिथे ते उपस्थित स्पर्धकांशी खूप मजामस्ती करतात. तसेच तिथे ते अनेक गोष्टींचा खुलासादेखील करतात. अशाच एका केबीसीच्या आगामी एपिसोडमध्ये बिग बी, जया बच्चनसोबत लग्न करण्यामागचे कारण सांगताना दिसणार आहेत. 

कौन बनेगा करोडपतीचा नवा प्रोमो समोर आला आहे.  या आगामी एपिसोडमध्ये प्रियंका महर्षि या स्पर्धक हॉट सीटवर बसल्या आहेत आणि बिग बी त्यांच्याशी गप्पा मारत आहेत. ह्या स्पर्धकाचे केस लांबसडक असल्यामुळे त्यांच्या केसांचे कौतुक करताना बिग बी म्हणाले, मी माझ्या पत्नीशी लग्न करण्यामागचे एक कारण असेही होते, ते म्हणजे जयाजींचे केस खूप लांब होते. या व्यतिरिक्त बिग बी स्पर्धकाच्या दोन्ही हातांवर असलेल्या टॅटूबद्दलसुद्धा चौकशी करताना दिसतात. याचाच अर्थ अमिताभजी त्यावेळी जया बच्चन यांच्या लांबसडक केसांमुळे त्यांच्यावर घायाळ झाले होते.

कौन बनेगा करडोपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन अनेकदा हॉट सीटवर बसून आपले आणि जया बच्चन यांचे वेगवेगळे किस्से शेअर करत असतात. ते आपल्या पत्नीसाठी करवाचौथचे व्रतदेखील करतात हे देखील त्यांनी पूर्वी याच शोमध्ये सांगितले होते.

जंजीर या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यातच अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस साजरा झाला. तेव्हा जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी केबीसीच्या सेटवर येऊन बिग बींना सरप्राइज दिले होते.