अक्षय कुमार आणि रवीना टंडनचा साखरपुडा होऊनही लग...

अक्षय कुमार आणि रवीना टंडनचा साखरपुडा होऊनही लग्न झाले नाही, या कारणामुळे झाला होता ब्रेकअप (Why Could not Akshay Kumar and Raveena Tandon Get Married even after Engagement, Know What was the Reason for Breakup)

हिंदी चित्रपटसृष्टीत एके काळी अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमारची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली होती. ही जोडी केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांना खूप आवडली. ९० च्या दशकात या जोडीची लव्हस्टोरीही बॉलिवूडमध्ये खूप गाजली होती. दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचे बोलले जात होते. साखरपुड्यानंतरही अक्षय कुमार आणि रवीना टंडनचे लग्न होऊ शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

 रवीना टंडन आणि अक्षय कुमारचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडयचे, परंतु खऱ्या जीवनातही दोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले होते. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, 1994 मध्ये ‘मोहरा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

या चित्रपटानंतर अक्षय आणि रवीना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. इतकंच नाही तर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागल्या. असे म्हटले जाते की अक्षय आणि रवीना सुमारे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा दोघांनी साखरपुडाही केला होता. परंतु लग्न व्हायच्या आधीच त्यांच्या नात्यात दुरावा आला.

साखरपुडा होऊनही अक्षय आणि रवीनाने एकमेकांसोबत लग्न का केले नाही? असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. 1996 मध्ये ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांच्या नात्यात सर्व काही बदलले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारची सदाबहार अभिनेत्री रेखासोबतची जवळीक वाढू लागली होती. रवीनाला जेव्हा हे कळले तेव्हा तिला खूप धक्का बसला आणि तिने अक्षयसोबतचे नाते संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार रेखामुळे अक्षय आणि रवीनाचे ब्रेकअप झाले. याशिवाय तर काहींच्या मते, रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असूनही अक्षय शिल्पा शेट्टीला डेट करत होता, तो तिलाही फसवत होता, त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.