भप्पी लाहिरी यांना सोन्याचं वेड कां आहे? कारण ...

भप्पी लाहिरी यांना सोन्याचं वेड कां आहे? कारण ऐकून चकित व्हाल! (Why Bhappi Lahiri Wears So Much Gold : You Will Be Stunned To Know The Reason)

संगीतकार भप्पी लाहिरी,  हे त्यांनी दिलेल्या छान छान गाण्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांना सोन्यांच्या दागिन्यांचे जे वेड आहे, त्याबद्दलही  प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांना एवढे सोने अंगावर बाळगण्याचा सोस कां आहे? जाणून घेऊ या.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
भप्पीदा यांचं खरं नाव आहे ओलोकेश. आपल्याला सोन्याचे दागिने घालण्याचा एवढा सोस कां आहे, याबाबत त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
अमेरिकन पॉप सिंगर एल्विस प्रिस्ले यांचा भप्पीदांवर जास्त प्रभाव होता. एल्विस नेहमी सोन्याची साखळी गळ्यात घालत असे. ‘मी जेव्हा खूप लोकप्रियता मिळविन तेव्हा आपली प्रतिमा  एल्विस सारखी बनवीन,’ असे त्यांनी मनाशी ठरवले होते. शिवाय ते सोन्याला जास्त लकी समजतात.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
भप्पीदांनी २०१४ साली भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा आपली संपत्ती जाहीर करताना आपल्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो  चांदी आहे, असं सांगितलं होतं. आज या ऐवजाची किंमत २ कोटी रुपयांहून अधिक भरेल. त्याच प्रमाणे आपली पत्नी चित्रवानी हिच्याकडे ९६७ ग्रॅम सोन आणि ८.९ किलो चांदी असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. याशिवाय तिच्याकडे हिऱ्यांचे दागिने आहेत ते वेगळेच.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
बॉलिवूड चित्रपटांमधून, ७० च्या दशकात रॉक आणि डिस्को संगीताने धूम माजवणारे संगीतकार भप्पी लाहिरीं हे आज २० कोटीहून अधिक रुपये संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे पिताजी बंगाली गायक होते आणि आई पण संगीतकार होती. अशा रीतीने त्यांच्याकडे संगीत वंश परंपरेने चालत आले आहे.