आयुष्मान खुराना या कारणामुळे हुमा कुरेशीला म्हण...

आयुष्मान खुराना या कारणामुळे हुमा कुरेशीला म्हणतो चुम्मा कुरेशी (Why Ayushmann Khurrana Calls Huma Qureshi ‘Chumma Qureshi’, Know The Interesting Story Behind This)

हुमा कुरेशीने आपल्या करीअरमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत पण तिने बॉलिवूडमध्ये आपले पक्के स्थान निर्माण केले आहे. सध्या हुमा आपली पॉलिटिकल ड्रामा वेब सिरिज ‘महाराणी 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती लवकरच ‘द कपिल शर्मा शो’मध्येही दिसणार आहे. या शोच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या प्रोमोवरुन तरी हा एपिसोड खूप रंजक असेल असेच वाटते.

शोमध्ये हुमाने एक मजेदार गोष्ट शेअर करत सांगितले की आयुष्मान खुराना तिला हुमा कुरेशी नाही तर चुम्मा कुरेशी अशी हाक मारतो. हुमाने या नावामागचा एक मनोरंजक किस्साही शेअर केला.

शोमध्ये कपिलने हुमाला विचारले की बरेच लोक तुला चुम्मा कुरेशी असे का म्हणतात, हे नाव कसे पडले? यावर हुमाने त्यामागची संपूर्ण कहाणी सांगितली आणि हे टोपणनाव तिला आयुष्मान खुरानाने दिले असल्याचेही सांगितले.

कपिल शर्माशी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, मी आणि आयुष्मान खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र एक म्युझिक व्हिडिओ केला होता. तेव्हापासूनच आम्ही चांगले मित्र झालो. मग शूटिंगच्या वेळी मी त्याला आयुष-मॅन म्हणायचे, त्यानंतर एका मीडिया मुलाखतीत त्याने मला चुम्मा कुरेशी म्हटले आणि अजूनही तो मला या नावाने त्रास देत असतो.

महाराणी 2 च्या प्रमोशनसाठी हुमा कपिल शर्माच्या शोमध्ये गेली होती. हा एपिसोड 18 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.