आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती का दिसत नाही ?...

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती का दिसत नाही ?…गुपित झाले उघड ! ( Why arundhati disappeared in aai kuthe kay karte serial : truth revealed)

टीआरपीच्या स्पर्धेत नेहमीच वरच्या स्थानावर असलेली आई कुठे काय करते या मालिकेला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. मालिकेतील मुख्य पात्रासोबतच इतर पात्रांना देखील समान महत्व देणे हा या मालिकेचा महत्वाचा गुण आहे. मालिकेची नायिका ही नेहमीच २० ते ३० वयातीलच असावी या प्रथेला या मालिकेने छेद दिला त्यामुळे प्रेक्षकांची विशेष पसंती या मालिकेला मिळते.

आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती हे पात्र साकारणाऱ्या  अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर देखील तिचे चाहते कमेंटमार्फत ती करत असलेल्या कामाची पसंती दर्शवत असतात. पण गेले काही दिवस मालिकेत अरुंधतीचे सीन फार कमी पाहायला मिळत आहेत.

मालिकेत सध्या संजना अनिरुद्ध किंवा संजना अनघा यांचे सीन जास्त दाखवले जात आहेत. त्यामुळे अरुंधतीच्या चाहत्यांना ती गेली कुठे हा प्रश्न सध्या सतावत आहे.

पण अरुंधती म्हणजेच मधुराणीने तिच्या वैयक्तिक कारणामुळे कामातून ब्रेक घेतल्याची बातमी समोर आली आहे. अरुंधती सध्या शूटला नसल्यामुळे मालिकेचे कथानक संजना, अनिरुद्ध, अनघा या पात्रांभोवती फिरते आहे.