अमृता फडणवीस यांना मंगळसुत्राचे वावडे का ? (why...

अमृता फडणवीस यांना मंगळसुत्राचे वावडे का ? (why amruta phadnavis dislike to wear mangalsutra)

झी मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या बस बाई बस या महिलांसाठी विशेष असलेल्या शोमध्ये विविध क्षेत्रातील महिला उपस्थित राहून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. या शोचे सुत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे.

या शोच्या एका भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी सुबोध भावेंनी तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतर महिलांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

त्यावेळी एका महिलेने अमृता फडणवीस यांना विचारले की, तुम्ही मंगळसुत्र घातलं नाही तर तुमच्या सासूबाई तुम्हाला ओरडत नाही का ? यावर अमृता यांनी उत्तर दिले की, मंगळसुत्र हे सौभाग्याचे प्रतिक आहे.

ते गळ्यात घातले तर पतीने माझा गळा पकडलाय असे मला वाटते, त्यामुळे मी मंगळसुत्र गळ्यात घालण्याऐवजी हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असे मला वाटते.

अमृता फडणवीस यांना त्यांच्या मेकअपवरुन देखील ट्रोल केले जाते. त्याचवरुन या शोमध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, बरे झाले तुम्ही स्वत: मला हा प्रश्न विचारला. सोशल मीडियावर मला खूप ट्रोल केले जाते. प्लास्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे.

तसेच त्यामध्ये धोकाही खूप असतो. जरा जरी काही चुकले तर तुमच्या चेहऱ्याचे सर्व फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते. मी लग्नाच्या वेळी पहिल्यांदाच मेकअप केला होता.