अमिताभ बच्चन यांना हॉटेलमध्ये नूडल्स खायला वाटत...

अमिताभ बच्चन यांना हॉटेलमध्ये नूडल्स खायला वाटते लाज, बिग बींनी स्वत: सांगितले या मागील कारण (Why Amitabh Bachchan Feels Shy of Eating Noodles in Restaurant, He Reveals the Reason)

 मेगास्टार अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. त्यांच्या काळातील अनेक कलाकार इंडस्ट्रीतून गायब झाले मात्र 80 वर्षीय अमिताभ बच्चन इंडस्ट्रीत अजूनही सतत कार्यरत आहेत. बिग बी सध्या रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’चे सूत्रसंचालन करत आहेत. शोमध्ये सध्या ‘ज्युनियर स्पेशल एपिसोड’ चालू आहेत. या एपिसोडना प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळते. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, बिग बींनी 9 वर्षांच्या अंशुमन पाठकसोबत खूप मजा केली. तसेच त्याच्यासोबत अनेक गोष्टीही शेअर केल्या.

‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या ज्युनियर स्पेशल एपिसोडमध्ये 9 वर्षांचा अंशुमन पाठक हॉटसीटवर दिसला. बिग बींना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत अंशुमनने त्यांना ग्रीटिंग कार्ड दिले.

बिग बींसोबत झालेल्या संवादादरम्यान अंशुमनने सांगितले की, मोठे झाल्यावर मला व्हिडिओ गेम डेव्हलपर बनायचे आहे. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतरच बिग बींनी सांगितले की, त्यांना रेस्टॉरंटमध्ये नूडल्स खायला लाज वाटते. यामागचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की, मला चॉपस्टिक्सने कसे खायचे हे माहित नाही, त्यामुळे मला ते खाताना लाज वाटते.

अमिताभ बच्चन यांच्या म्हणण्यानुसार, ते चॉपस्टिक्सने नूडल्स खाऊ शकत नाहीत, जेव्हा ते चॉपस्टिक्सने नूडल्स खाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नूडल्स नेहमी पडतात, त्यामुळे त्यांना खूप लाज वाटते. विशेषत: रेस्टॉरंटमध्ये नूडल्स खाताना त्यांना जास्त लाज वाटते, त्यामुळे ते रेस्टॉरंटमध्ये नूडल्स खाणे टाळतात.

मात्र, अमिताभ बच्चन यांनी चॉपस्टिक्ससह नूडल्स न खाण्याच्या समस्येवर एक उत्तम उपाय शोधून काढल्याचा खुलासाही केला आहे. ते म्हणाले की, मी आता सर्व नूडल्स आधी कापतो आणि नंतर काटा किंवा चमच्याने खातो, पण रेस्टॉरंटमध्ये नूडल्स खाणे टाळण्याचा प्रयत्न करतो.

 संभाषणादरम्यान, अंशुमन याने तो बिग बींचा मोठा चाहता असल्याचे सांगत त्यांच्याकडे तक्रारही केली, तो म्हणाला की, मी एकदा तुम्हाला भेटायला तुमच्या घरी गेला होता, पण तुम्ही आला नाहीत. यावर अमिताभ म्हणाले की तू येत आहेस हे सांगायला हवं होतं, मला माहीत असतं तर मी तुला नक्की भेटलो असतो.