गुम है किसी के प्यार में मधील पाखी म्हणजेच अभिन...

गुम है किसी के प्यार में मधील पाखी म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा या कारणामुळे करु शकत नाही क्लासिकल डान्सिंगमध्ये पीएचडी(Why Aishwarya Sharma not Did PhD In Classical Dancing, Pakhi Of ‘Ghum Hai Kisi Ke Pyar Mein’ Revealed The Reason)

प्रेक्षकांच्या आवडत्या टीव्ही मालिकांपैकी एक असलेल्या ‘गुम है किसी के प्यार में’ मधील पाखी म्हणजेच ऐश्वर्या शर्मा आपल्या व्यक्तिरेखेसाठी प्रत्येक घरात खूप प्रसिद्ध आहे. पत्रलेखा म्हणजेच पाखी या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेली ऐश्वर्या शर्मा हे नाव आज टीव्हीच्या सर्वात आवडत्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अर्थात, ऐश्वर्या एक उत्तम अभिनेत्री आहेच, पण ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिला शास्त्रीय नृत्यात पीएचडी करायची होती, पण ती इंजिनियर झाली आणि त्यानंतर ती अभिनयाच्या जगात आली.

असे म्हटले जाते की, ऐश्वर्या शर्मा लहानपणापासूनच अभ्यासाच्या बाबतीत खूप हुशार आहे, पण तिला शालेय दिवसांपासून अभिनयातही रस होता, त्यामुळे शाळेपासून ते कॉलेजपर्यंत ती अनेकदा मिमिक्री आणि ड्रामा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. ऐश्वर्या आपल्या मिमिक्री आणि अभिनयासाठी शाळा-कॉलेजमध्ये खूप प्रसिद्ध होती.

अभिनयासोबतच ऐश्वर्याला नृत्याचीही आवड होती. तिची नृत्याची आवड एवढी होती की तिला शास्त्रीय नृत्यात पीएचडी करायची होती, मात्र, अभिनयाची आवड असल्याने तिने शास्त्रीय नृत्यात पीएचडी करण्याचा विचार सोडून दिला. त्यानंतर तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि ती इंजिनियर झाली.

लहानपणापासून अभिनय हे तिचे सर्वात मोठे स्वप्न असले तरी, अभियांत्रिकी केल्यानंतर तिने अभिनय करीअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, त्यासाठी कठोर परिश्रम केले. आज ऐश्वर्या टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘गुम है किसी के प्यार में’, ‘मेरी दुर्गा’, ‘संकट मोचन महाबली हनुमान’, ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘जांबाज सिंदबाद’ आणि ‘सुराज्य संहिता’ या मालिकांमध्ये ऐश्वर्याने काम केले आहे.

‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका ऐश्वर्यासाठी खूप लकी ठरली आहे, कारण तिला या शोच्या सेटवर तिचा जीवनसाथी मिळाला होता. शोमध्ये दिर आणि वहिनीची भूमिका करणारे नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा दोघेही सेटवर भेटले तेव्हा महिनाभरानंतरच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

विशेष म्हणजे, प्रेम व्यक्त केल्यानंतर ऐश्वर्या आणि नीलला लग्नासाठी फारसे प्रयत्नही करावे लागले नाहीत कारण या लग्नासाठी दोन्ही कुटुंबे आनंदाने तयार होती, त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली आणि जवळपास 11 महिन्यांनंतर दोघांचे लग्न झाले.