कोण होता श्रद्धा कपूरचा पहिला बॉयफ्रेंड, बॉलिवू...
कोण होता श्रद्धा कपूरचा पहिला बॉयफ्रेंड, बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच अभिनेत्री झाली त्याच्यापासून दूर(Who was Shraddha Kapoor’s first boyfriend, Actress Distanced Herself from him After Entered in Films)

बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने आपल्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली. श्रद्धाच्या तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याच्याही चर्चा झाल्या. आत्तापर्यंत या अभिनेत्रीचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले आहे, परंतु ती अद्याप अविवाहितच आहे. सध्या ती लग्नाच्या कोणत्याही मूडमध्ये असल्याचे दिसत नाही.

जेव्हा श्रद्धा कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचे प्रयत्न चालू होते.तेव्हा ती मुंबईत राहणाऱ्या एका ज्वेलर्सचा मुलगा वनराज झवेरी याला डेट करत होती. श्रद्धा आणि वनराज हे एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत. त्यांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. श्रद्धा बोस्टनला शिकण्यासाठी गेली तेव्हा दोघेही जवळपास एक वर्ष लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते.

असे म्हटले जाते की, श्रद्धा आणि वनराजच्या कुटुंबीयांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती, त्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या नात्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, अभ्यास आणि करीअरमुळे दोघांनीही आपले नाते सार्वजनिक केले नाही. त्यादरम्यान श्रद्धा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत होती.

रिपोर्ट्सनुसार, श्रद्धाच्या करीअरची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटाने झाली, पण जेव्हा तिच्या नशिबात यशराज फिल्म्सचा चित्रपट आला आणि तो सुपरहिट झाला तेव्हा श्रद्धाने आपला बॉयफ्रेंड वनराजपासून स्वतःला दूर केले. श्रद्धा आणि वनराजच्या ब्रेकअपमागचं कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ब्रेकअप झाल्यानंतरही श्रद्धा वनराजला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर, प्रसिद्ध डायमंड ब्रँड टीबीझेड चेनचे मालक वनराज यांनी लग्न केले आणि आज तो आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे, तर श्रद्धा अजूनही अविवाहित आहे आणि आपल्या फिल्मी करीअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

वनराज झवेरी हा या अभिनेत्रीचा पहिला बॉयफ्रेंड होता, पण फिल्मी दुनियेत आल्यानंतर जेव्हा श्रद्धाने आदित्य रॉयसोबत ‘आशिकी 2’मध्ये पहिल्यांदा काम केले तेव्हा खऱ्या आयुष्यातही दोघांमधील जवळीक वाढू लागली. आदित्य रॉय कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर श्रद्धाचे नाव फरहान अख्तरसोबत जोडले गेले, पण त्यांच्या प्रेमकथेत शक्ती कपूर खलनायक ठरले. फरहानपासून वेगळे झाल्यानंतर श्रद्धाचे नाव सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबतही जोडले गेले होते, मात्र कालांतराने त्यांच्याही ब्रेकअपची बातमी समोर आली.

श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे तर, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटासाठी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेत्री लवकरच ‘चालबाज इन लंडन’, ‘लव्हली सिंग’ आणि ‘स्त्री 2’ मध्ये दिसणार आहे.