कोण आहे वैशालीचा माजी प्रियकर राहुल, ज्याच्या ज...

कोण आहे वैशालीचा माजी प्रियकर राहुल, ज्याच्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने केली आत्महत्या (Who is Vaishali Thakkar’s alleged ex BF Rahul named in suicide note, Actress reveals his torture Story in her suicide note)

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी वैशालीचे मृत्युला कवटाळले असले तरी तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न सतावत आहेत. तिच्या सुसाईड नोटमध्ये वैशालीने तिच्या मृत्यूसाठी तिच्या माजी प्रियकराला जबाबदार धरले असून अडीच वर्षांपासून तो तिचा छळ करत असल्याचे सांगितले आहे.

वैशालीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?

दरम्यान, वैशालीची सुसाईड नोट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की ”I Quit आई. आई-बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा मी एक चांगली मुलगी नाही बनू शकले. राहुल आणि त्याच्या कुटुंबामुळेच मी हे पाऊल उचलत आहे. त्यांना माफ करू नका. चांगली शिक्षा द्या. राहुल आणि दिशा यांनी मला अडीच वर्ष शारिरीक आणि मानसिक रित्या खूप छळलं. त्यांना शिक्षा नाही झाली तर माझ्या आत्म्यास शांती नाही मिळणार. तुम्हाला माझी शपथ आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मितेशला सांगा मला माफ कर. I Quit”.

राहुल कोण आहे?

वैशालीने आपल्या मृत्यूसाठी राहुल नवलानी नावाच्या व्यक्तीला जबाबदार धरले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल हा वैशालीचा शेजारी आहे. जो एक बिझनेसमन आहे. वैशालीचं घर इंदौर येथे साई बाग कॉलनीमध्ये आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राहुलमुळे वैशालीनं आत्महत्या केली. वैशालीचं लवकरच लग्न होणार होतं. पण राहुल वैशालीला खूप त्रास देत होता. खरंतर राहुल हा वैशालीचा एक्स बॉयफ्रेंड होता. राहुलने वैशालीची मैत्रीत फसवणूक केली. त्याने फसवणूक करून त्यांचे फोटो काढले आणि नंतर हे फोटो-व्हिडिओ तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले, ज्यामुळे तिचा साखरपुडा मोडला.

राहुलचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असले तरी गेल्या अडीच वर्षांपासून राहुल त्याच्या पत्नीसह वैशालीवर सतत अत्याचार करत होता, त्यामुळे वैशाली कंटाळली होती आणि तिला मृत्यूला कवटाळावे लागले. वैशालीने तिच्या सुसाईड नोटमध्ये याबाबत आणखी अनेक खळबळजनक खुलासे केले असले तरी पोलिसांनी सध्यातरी अभिनेत्रीच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.

वैशालीच्या फ्रेंड्सच्या म्हणण्यानुसार, वैशाली डिसेंबरमध्ये लग्न करणार होती आणि लग्नाच्या दोन महिने आधीच वैशालीनं आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलणं खूप धक्कादायक आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुसाईड नोटच्या आधारे राहुल आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सध्या वैशालीच्या आत्महत्येने टीव्ही विश्वात खळबळ उडाली आहे.