कर्नाटकची सिनी शेट्टी बनली मिस इंडिया २०२२ ची व...

कर्नाटकची सिनी शेट्टी बनली मिस इंडिया २०२२ ची विजेती ; जाणून घेऊया या सौंदर्यसम्राज्ञीबद्दलच्या मनोरंजक गोष्टी (Who is Miss India 2022 winner Sini Shetty, Know Interesting Facts About Beauty Queen)

मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल ३ जुलै रोजी संपन्न झालेल्या ‘मिस इंडिया २०२२’ च्या ग्रँड फिनालेमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shetty) हिने यावर्षीचा ‘मिस इंडिया’चा मुकुट आपल्या नावावर केला आहे. ती ‘मिस इंडिया २०२२’ची विजेता ठरली आहे. तर या स्पर्धेत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान सेकंड रनर अप बनल्या आहेत.

यावर्षीच्या मिस इंडिया स्पर्धेत ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. वेगवेगळ्या राज्यातील मॉडेल्समध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने चुरशीशी स्पर्धा रंगली होती. आपल्या सौंदर्याने आणि बुद्धीने या सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांना घायाळ केले असले तरी सिनी शेट्टीने यात सरशी मिळवली आहे. जाणून घेऊया सिनी शेट्टी बद्दलच्या काही गोष्टी…

सिनी शेट्टी २१ वर्षांची असून ती कर्नाटकची राहणारी आहे. मात्र तिचा जन्म हा मुंबईचा आहे.

सिनी शेट्टीनं अकाउंटींग आणि फायनान्स मध्ये पदवी संपादन केली आहे.

सिनी शेट्टी सध्या सीएफएफचा एक प्रोफेशनल कोर्स देखील करीत आहे.

सिनी शेट्टीनं वयाच्या चौथ्या वर्षापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली होती. केवळ वयाच्या १४व्या वर्षातच सिनी शेट्टीनं अरंगत्रम आणि भरतनाट्यमचा अभ्यास पूर्ण केला होता.

सिनी अष्टपैलू आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सौंदर्याबरोबरच ती अतिशय बुद्धिमान आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक डान्स व्हिडिओज आहेत. सिनीच्या क्लासिकल डान्सच्या रिल्स सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. मिस इंडिया स्पर्धेतही सिनीने डान्स केला होता, जो परीक्षकांनाही अतिशय आवडला होता.

सिनीने मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अनेक मोठमोठ्या ब्रँड्‌सच्या जाहीरातीमध्ये ती दिसली आहे.

सिनी शेट्टी केवळ प्रोडक्ट एक्झिक्युटिव्हच नाही तर डान्सर, अॅक्टर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर देखील आहे.

मिस इंडिया सिनी सोशल मीडिया वर अत्यंत सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ६६.३ करोड इतके फॉलोअर्स आहेत.

सिनी अभिनेत्री प्रियंका चोप्राची चाहती आहे. प्रियंकाने २००० साली मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता, तेव्हापासून सिनी प्रियंकाला फॉलो करते आहे. ‘मिस इंडिया २०२२’ च्या या ग्रॅंड फिनालेमध्ये नेहा धूपिया, कृती सेनन, मनिष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरिया, मिताली राज, मलायका अरोरा सोबतच अनेक बडे सेलिब्रिटी सामिल झाले होते.