करीअरला प्राधान्य देणाऱ्या जगात या अभिनेत्री कम...

करीअरला प्राधान्य देणाऱ्या जगात या अभिनेत्री कमी वयातच बनल्या आई (While Many Actresses Give Attention To Career, These Bollywood Actresses Became Mothers At A Young Age, Took Care Of The Family)

आई होणे हा एक असा आनंद आहे जो कोणत्याही स्त्रीसाठी सर्वोतपरी खास आहे. पण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करिअरला आधी प्राधान्य देऊन दीर्घ काळानंतर हा आनंद मिळवला, मात्र काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी कुटुंबासाठी आपलं करिअर पणाला लावले आणि त्या कमी वयातच आई बनून सिद्ध केले की, त्यांच्यासाठी यापेक्षा अधिक काही नव्हते.

आलिया भट्ट

एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरसोबत लग्न करणारी आलिया भट्ट 30 वर्षांची आहे. आलियाने आपल्या करीअरमध्ये भरपूर यश संपादन केले. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या आलियाकडे अनेक मोठ्या प्रोजेक्टची लाइन लागली आहे. पण तिने लवकर लग्न करुन लगेच आई होण्याचा निर्णय घेतला. यावेळी आलियाने ना तिच्या वयाचा विचार केला ना तिच्या करीअरचा.

जेनेलिया डिसूजा

अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये रितेश देशमुखसोबत लग्न केले होते. त्यानंतर तिने वयाच्या 27 व्या वर्षीच पहिला मुलगा रियानला जन्म दिला. त्यानंतर तिला दुसरा मुलगाच झाला. मुलांच्या जन्मानंतर ती आपल्या फिल्मी करीअरपासून थोडी दूर गेली पण तरीही ती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय असते.

काजोल

एके काळी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये काजोलचे नाव अग्रस्थानी यायचे. पण अजय देवगणसोबत लग्न झाल्यानंतर मात्र तिच्या यशात थोडा खंड पडू लागला. काजोलने वयाच्या 29 व्या वर्षी आपली मोठी मुलगी न्यासाला जन्म दिला. त्यानंतर ती आपल्या कुटुंबात मग्न झाली. काजोल अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र ती आपल्या मुलांना तिची प्राथमिक जबाबदारी समजते.

भाग्यश्री

मैने प्यार किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वयाच्या 17 व्या वर्षी आपला प्रियकर हिमालयसोबत लग्न केले होते. त्यानंतर ती 20 व्या वर्षी आई झाली.

नीतू कपूर

रणबीर कपूरची आई नीतू कपूरने आपल्या करीअरच्या यशाची शिखरे पार करत असतानाच ऋषि कपूरसोबत लग्न केले होते. पण प्रेमापुढे त्यांनी आपल्या करीअरला दुय्यम स्थान दिले. नीतू कपूर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी लग्न केले. त्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी मुलगी रिद्धिमा आणि 24 व्या वर्षी रणबीर कपूरला जन्म दिला.