जिना कुठे असावा ? (Which Is The Right Place For...

जिना कुठे असावा ? (Which Is The Right Place For Stairs Inside The Home)

आम्ही गावी घर बांधायला घेतलं आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घरातून जिना ठेवायचा आहे. हा जिना कुठे आणि कसा असावा, यासाठीही काही
नियम असतात का?

 • मंदा, ठाणे
  हो, जिना कुठे आणि कसा असावा यासाठीही काही नियम फेंगशुई शास्त्रात सांगण्यात आले आहेत. ते पाळल्यास प्रसिद्धी मिळण्यास मदत होते. तर घरातील दक्षिण किंवा पश्‍चिम दिशेला जिना असावा. तसंच या जिन्यातील
  पायर्‍या विषम संख्येत असाव्यात.

स्फटिकांचे गोळे कोणत्या दिशेला ठेवावेत?

 • नीलम, नाशिक
  आठ स्फटिकांचे गोळे ईशान्य दिशेला ठेवल्यास, अभ्यासात उपयुक्त ठरतात. तसंच कारकिर्दीत नवी संधी मिळवण्यासाठीही मदत करतात. आग्नेय दिशेला सहा स्फटिकांचे
  गोळे ठेवल्यास उद्योगधंद्यात यशाची प्राप्ती होते

आम्ही हल्लीच एक नवं घर घेतलं आहे. या घराच्या पूर्व दिशेला रस्ता आहे. त्याचे आमच्या घरावर किंवा आमच्यावर काही परिणाम होतील का?

 • हेमंत, कुडाळ
  आपल्या वास्तूच्या पूर्व दिशेला लागून जाणारा रस्ता असल्यास झपाट्याने प्रगती होते. कीर्ती आणि संपत्तीमध्ये वृद्धी होते. पूर्व ही उगवती दिशा असल्यामुळे आपले तारे नेहमीच उगवते राहतील. थोडक्यात, पूर्वेचा रस्ता म्हणजे, उज्ज्वल
  यशाकडे जाण्याचा मार्ग होय.

घरात सतत सौख्य आणि भरभराट राहावी, यासाठी काही उपाय सांगता येतील का?

 • राजाराम, धुळे
  घरातील दिशा आणि त्या दिशांची तत्त्व यांची सुयोग्य मांडणी अतिशय महत्त्वाची असते. अशी सुयोग्य मांडणी घरात कायमचं यश आणि सुख प्राप्त करून देऊ शकते. कारण सर्व तत्त्व योग्य दिशेला असली की, वास्तू ‘तथास्तु’ म्हणते.