डोळा मारुन सर्वांना घायाळ करणारी विंक गर्ल प्रि...

डोळा मारुन सर्वांना घायाळ करणारी विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर सध्या कुठे आहे ? (Where Is ‘Wink Girl’ Priya Prakash Varrier Now? See Her Latest Pictures)

साधारण चार वर्षांपूर्वी एका तरुणीने डोळा मारुन सर्वांना घायाळ केले होते. त्यामुळे ती रातोरात स्टार बनली होती.

ती मुलगी म्हणजे विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर, प्रियाचा एक व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, तेव्हा देशातील प्रत्येक तरुणाला प्रियाचे वेडं लागले. अभिनेत्री असूनही प्रियाला जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती तितकी प्रसिद्धी तिला त्या व्हिडिओमुळे मिळाली. तो व्हिडिओ ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातील होता.

  व्हिडिओत शाळेतील एका मुलाचे आणि मुलीचे डोळ्यांचे इशारे चालू असतात. त्यावेळी ती मुलगी म्हणजे प्रिया असे काही करते ज्यामुळे तो मुलगा थक्क होऊन जातो. एकमेकांशी नजरेने बोलत असताना प्रिया त्या मुलाला अचानक डोळा मारते. त्यामुळे तो मुलगा घायाळ होऊन जातो.

या व्हिडिओमुळे प्रियाला ‘द विंक गर्ल’ हे नवीन नाव मिळाले. त्यानंतर हा व्हिडीओ ज्या चित्रपटात होता तो प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. प्रियाने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाची सुरुवात एका मल्याळम चित्रपटातील छोट्या भूमिकेतून झाली होती.

28 ऑक्टोबर 1999 ला प्रियाचा जन्म केरळमध्ये झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली. तसेच तिने काही जाहिरातींमध्ये मॉडेलिंगही केली. मात्र तिचा बॉलिवूडमध्ये हवातसा चाहता वर्ग तयार झाला नाही.

  2021 मध्ये प्रियाने चेक चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती तेलगू चित्रपट इश्कमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपट हिट झाला. असे असले तरी प्रेक्षकांना ती अजूनहूी त्या व्हिडिओमधलीच प्रिया लक्षात राहते. त्यामुळे मला आता त्या इमेजमधून बाहेर पडायचे आहे असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम