जोधा-अकबर फेम रजत टोकस सध्या काय करतो, सर्वात श...

जोधा-अकबर फेम रजत टोकस सध्या काय करतो, सर्वात शेवटी नागिन 3 मध्ये दिसला होता अभिनेता(Where is ‘Jodha-Akbar’ Fame Rajat Tokas These Days, Actor Was Last Seen in ‘Naagin 3’)

‘जोधा-अकबर’ ही टीव्ही मालिका घराघरात खूप लोकप्रिय होती. या मालिकेत रजत टोकस अकबरच्या भूमिकेत दिसला होता, तर परिधी शर्माने जोधाची भूमिका साकारली होती. 2013 मध्ये ही मालिका टीव्हीवर प्रसारित व्हायची, या मालिकेमुळे रजत टोकसला घरोघरी खूप प्रसिद्धी मिळाली. रजतने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती, पण गेल्या काही वर्षांपासून तो टीव्ही जगतापासून पूर्णपणे गायब झाला आहे.

रजत टोकसच्या चाहत्यांना आपला आवडता अभिनेता कुठे गायब झाला आणि तो काय करतोय? असा प्रश्न अनेकदा पडतो. अभिनेता जरी पडद्यापासून दूर तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेला असतो.

अभिनेता शेवटचा 2019 मध्ये एकता कपूरचा हिट शो ‘नागिन 3’ मध्ये दिसला होता. या मालिकेनंतर तो पडद्यावरून गायब आहे. मात्र सोशल मीडियावर त्याचे अजूनही जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. सुमारे 368 हजार लोक त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्याने अलीकडेच एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याचा लूक खूपच बदललेला दिसत आहे.

रजत टोकसने आपले शालेय शिक्षण दिल्लीतून केले आहे, परंतु त्याने डिस्टन्स मोडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयाची आवड असल्याने रजतने याच क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला. डीडी नॅशनलच्या ‘बोंगो’ या शोमधून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो ‘जादुई चिराग’, ‘तरंग’ आणि ‘ये हवाएं  सारख्या मालिकांमध्ये दिसला.

2005 मध्ये रजत वडिलांसोबत मुंबईत आला, त्यानंतर त्याला ‘साई बाबा’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजे 2006 मध्ये, रजत तरुण पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसला, त्या भूमिकेलासुद्धा प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. ही त्याची पहिली मुख्य भूमिका होती, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याने 2015 मध्ये थिएटर अभिनेत्री सृष्टी नय्यरशी लग्न केले. रजत टोकसने आपल्या प्रेयसीसोबत गुपचूप लग्न करून लाखो महिला चाहत्यांची मने तोडली. रजत अनेक मालिकांमध्ये दिसला असला तरी त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती ‘जोधा-अकबर’मधील अकबरची भूमिका साकारल्यानंतर. ही मालिका सुमारे दोन वर्षे चालली आणि नंतर 2015 मध्ये बंद झाली.