रुममध्ये रंगेहात मुलीसोबत पकडल्यावर वरुण धवनला ...

रुममध्ये रंगेहात मुलीसोबत पकडल्यावर वरुण धवनला भावाने ६ वेळा थोबडावलं…(When Varun Dhawan Was Caught Red Handed In The Room With A Girl, Brother Had Hit 6 Slaps)

अभिनेता वरुण धवनने इंडस्ट्रीमध्ये खूप कमी वेळात त्याचे स्थान पक्के केले आहे. वरुणने २०१२ मध्ये ‘स्टूडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून त्याच्या अभिनयातील करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने सलग हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. वरुण त्याच्या प्रोफेशन लाइफसोबतच वैयक्तिक लाइफसाठी सुद्धा चर्चेत असतो. एकदा एका कार्यक्रमात वरुण धवनने त्याच्या आयुष्यातले एक असे गुपित सांगितले जे ऐकून त्याचे वडील डेविड धवन खूप चकित झाले.

वरुण एका कार्यक्रमात अनुपम खेर आणि त्याचे वडील डेविड धवन यांच्या समोर एक किस्सा सांगत म्हणाला, मी एका मुलीसोबत एका रुममध्ये होतो तेव्हा अचानक दरवाजा वाजला. तेव्हा त्या मूलीने बाहेर तुझा भाऊ आलायं असे सांगितले. ते ऐकून मी जागीच थरथरायला लागलो होतो. मी जेव्हा रुमच्या बाहेर पडलो तसा माझ्या भावाने मला काहीही न बोलता सरळ कानाखाली मारली. आम्ही लिफ्टने जात होतो, जशी लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर पोहचली तशी रोहितने माझ्या आणखी एक कानाखाली मारली.

त्यावेळी घडला प्रकार आईबाबांना सांगू नको अशी विनंती मी रोहितला करत होतो. पुढे वरुणने सांगितले की, त्याचा भाऊ लिफ्ट जशी वर जात होती तसं प्रत्येक मजल्यावर एक एक अशी कानाखाली मारत होता. असा सगळा मिळून मी सहावेळा मार खाल्ला. आता भावाने मला एवढं मारल म्हणजे त्याचं मन शांत झालं असेल त्यामुळे तो घरी जाऊन आईबाबांना काही सांगणार नाही असा माझा समज झाला. पण घरी जाऊन उलटेच झाले. त्याने बाहेर मला मारलेच वर घरी जाऊन आईबाबांना सुद्धा सगळं सांगितलं.

वरुणने सांगितलेला हा किस्सा ऐकून अनुपम खेर आणि त्याच्या वडीलांना त्यांचे हसू आवरले नाही. वरुणने नंतर घरी गेल्यावरचा प्रकार सांगत म्हटले की, त्यावेळी घरी गेल्यावर.”  याच्या रुममध्ये मुलगी होती, हा माझं नाव खराब करत आहे” असं रोहितने आईबाबांना सांगितले. त्यावर मी त्याला म्हटले ,मी काय तुझे नाव खराब करणार, तू माझ्यापेक्षा फक्त ४ वर्षांनीच मोठा आहेस.

वरुण धवनला फिल्म इंडस्ट्रीत करण जोहरने लॉन्च केले होते. पण त्यानंतर वरुणने त्याच्या वडीलांच्या जुडवा २, मै तेरा हीरो, कुली नंबर २ या चित्रपटात काम केले. याशिवाय वरुणने रोहित धवनच्या ढिशूम या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्या सोबत जॉन अब्राहम, आणि जॅकलीन फर्नांडिससुद्धा होती.