उर्वशी रौतेलाला या कारणामुळे अचानक आले होते रडू...

उर्वशी रौतेलाला या कारणामुळे अचानक आले होते रडू (When Urvashi Rautela Used to Cry Suddenly, Actress Revealed The Reason for This)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, तिच्या ग्लॅमरस लूक आणि आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. उर्वशीने नुकतेच द लिजेंड या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटामुळे उर्वशी तमिळ चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. पण उर्वशीच्या आयुष्यात असा एक क्षण आला जेव्हा ती तिच्या सौंदर्यामुळे रडायला लागली.

उर्वशी रौतेलाने सनी देओलच्या ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी उर्वशी मॉडेलिंग करायची आणि ती एक प्रसिद्ध मॉडेल होती.

उर्वशी एक ग्लॅमरस आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे यात शंका नाही, मात्र तिला चित्रपटांमध्ये अधिकतर ग्लॅमरस भूमिका आणि आयटम नंबर करायला मिळतात. उर्वशी ‘हेट स्टोरी 4’ मध्येही दिसली होती, मात्र या चित्रपटात उर्वशीने साकारलेल्या भूमिकेमुळे ती खूपच हैराण झाल्याचे बोलले जाते.

2018 मध्ये, उर्वशीने एका एंटरटेन्मेंट पोर्टलला एक मुलाखत दिली होती, तेव्हा तिने सांगितले होते की, ‘हेट स्टोरी 4’ मध्ये तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ती इतकी हैराण झाली होती की तिला अचानक रडू यायचे. उर्वशीसोबत असे अनेक वेळा घडायचे. कालांतराने ते हळूहळू कमी झाले.

उर्वशी रौतेलाने या चित्रपटात सुपरमॉडेलचे पात्र साकारले होते. या पात्राच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात असे दाखवण्यात आले होते. या व्यक्तिरेखेसाठी तिला खूप मेहनत करावी लागली होती.

उर्वशी स्वत:ला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची फिमेल व्हर्जन मानते. हृतिकच्या काबिल चित्रपटातील हसीनों को दिवाना हे गाणे तिने केवळ ह्रतिकसाठीच केले होते. पण अजय देवगण, सलमान खान आणि संजय दत्तकडून जेव्हा तिला अशा गाण्यांसाठी विचारण्यात आले होते तेव्हा तिने त्यांना स्पष्ट नकार दिला होता. उर्वशी ह्रतिकची खूप मोठी चाहती आहे.

२०१५ मध्ये उर्वशीने मिस यूनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. याशिवाय तिने आणखी काही सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. उर्वशीच्या नावावर सर्वाधिक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा विक्रम आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उर्वशी लवकरच दिल है ग्रे आणि ब्लॅक रोज या चित्रपटांत दिसणार आहे.